Samsung India Recruitment 2022: खुशखबर! सॅमसंग इंडिया करणार 1 हजार अभियंत्यांची भरती
इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंग आर अँड डी इन्स्टिट्यूट बंगलोर, सॅमसंग आर अँड डी इन्स्टिट्यूट नोएडा, सॅमसंग आर अँड डी इन्स्टिट्यूट दिल्ली आणि सॅमसंग सेमीकंडक्टर इंडिया रिसर्च बेंगळुरूमधील देशभरातील अनेक शाखांसाठी अभियंत्यांची नियुक्ती करणार आहे.
Samsung India Recruitment 2022: सॅमसंग इंडिया (Samsung India) ने भारतभरातील त्यांच्या R&D संस्थांसाठी सुमारे 1,000 अभियंते नियुक्त करण्याची योजना आखली आहे. इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंग आर अँड डी इन्स्टिट्यूट बंगलोर, सॅमसंग आर अँड डी इन्स्टिट्यूट नोएडा, सॅमसंग आर अँड डी इन्स्टिट्यूट दिल्ली आणि सॅमसंग सेमीकंडक्टर इंडिया रिसर्च बेंगळुरूमधील देशभरातील अनेक शाखांसाठी अभियंत्यांची नियुक्ती करणार आहे.
या मोहिमेचा एक भाग म्हणून, Samsung R&D केंद्रे IIT मद्रास, IIT दिल्ली, IIT हैदराबाद, IIT बॉम्बे, IIT रुरकी, IIT खरगपूर, IIT कानपूर, IIT गुवाहाटी आणि IIT BHU यांसारख्या शीर्ष IIT मधून सुमारे 200 अभियंत्यांची नियुक्ती करतील. त्यांनी आयआयटी आणि इतर उच्च संस्थांमधील विद्यार्थ्यांना 400 हून अधिक प्री प्लेसमेंट ऑफर (पीपीओ) ऑफर केल्या आहेत. (हेही वाचा - CBSE Date Sheet 2023: सोशल मीडीयामध्ये वायरल होत असलेल्या CBSE Board Exam Date Sheet खोट्या; विद्यार्थी, पालकांना परीक्षा तारखांसाठी करावी लागणार अजूनही प्रतिक्षा)
संगणक विज्ञान आणि संबंधित शाखा (AI/ML/Computer Vision/VLSI इ.), माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, एम्बेडेड सिस्टम्स आणि कम्युनिकेशन नेटवर्क्स, गणित आणि संगणन व सॉफ्टवेअर अभियांत्रिकी यासारख्या अनेक विभागांमध्ये या नियुक्त्या केल्या जातील.
भरती प्रक्रियेतील कर्मचारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, इमेज प्रोसेसिंग, IoT, कनेक्टिव्हिटी, क्लाउड, बिग डेटा, बिझनेस इंटेलिजन्स, प्रेडिक्टिव अॅनालिसिस, कम्युनिकेशन नेटवर्क्स, सिस्टम ऑन अ चिप (SoC) आणि स्टोरेज सोल्यूशन्स, यांसारख्या अनेक नवीन-युग तंत्रज्ञानावर काम करतील.