RRB JE CBT 2 Exam 2019: आरआरबी जेई भरती सीबीटी-2 परीक्षेची तारीख बदलली, आज जाहीर होणार परीक्षा शहर व इतर माहिती
आता ही परीक्षा 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. आरआरबीने आज याबाबतची अधिसूचना जारी करुन याबाबत माहिती दिली आहे.
RRB JE CBT 2 Exam Date city details 2019: काही तांत्रिक कारणांमुळे आरआरबी जेई (RRB JE) भरती परीक्षेच्या दुसर्या टप्प्यातील परीक्षेची तारीख, अर्थात सीबीटी-2 (CBT 2) च्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. आरआरबीने आज याबाबतची अधिसूचना जारी करुन याबाबत माहिती दिली आहे. नव्या अधिसूचनेनुसार, परीक्षा शहर, डेट इंटीमेशन, ट्रॅव्हल पास आणि मॉक टेस्ट लिंकदेखील आज जाहीर केले जाणार आहेत. परीक्षेसाठी प्रवेशपत्रे 15 सप्टेंबरपासून देण्यात येतील.
ज्या उमेदवारांची केंद्र परीक्षा 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशा उमेदवारांसाठी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड 15 सप्टेंबरला प्रवेशपत्र देणार आहेत. उमेदवार त्यांच्या आरआरबी वेबसाइटवर जाऊन त्यांची परीक्षा तपशील तपासू शकतात. विद्यार्थ्यांना त्यांचे रोल नंबर परीक्षा दिवसाच्या चार दिवस आधी दिले जातील. आज, मॉक लिंक सक्रिय होईल, यावरून उमेदवार दुसर्या टप्प्यातील सीबीटीची तालीम सुरु करू शकतील. परीक्षा ऑनलाइन कशी दिसेल हे त्याला कळेल. (हेही वाचा: SBI Recruitment 2019: स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये 477 Specialist Cadre Officers पदांसाठी नोकर भरती जाहीर; sbi.co.in वर करा 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज)
आरआरबी जेई भरतीमध्ये 13,487 पदे आहेत. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता (जेई) ची 12,844, कनिष्ठ अभियंता (आयटी) ची 29 पदे, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट पदासाठी 227 आणि केमिकल आणि मेटेलर्जिकल असिस्टंट (सहाय्यक) ची 387 रिक्त पदे आहेत. डिसेंबर 2018 मध्ये आरआरबीच्या या रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती.