SBI Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6681 PO आणि लिपिक पदांसाठी भरती; पात्रता, अर्ज करण्याची अंतिम तारीख जाणून घ्या
तसेच आज 22 सप्टेंबर रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. SBI PO आणि लिपिकाच्या एकूण 6681 पदांसाठी भरतीसाठी अर्ज स्वतंत्रपणे करावे लागतील.
SBI Recruitment 2022: SBI मध्ये सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी यावेळी भरतीच्या भरपूर संधी आहेत. देशातील सर्वात मोठी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने नवरात्रीच्या आधी पदवीधरांसाठी हजारो नोकरीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. बँकेने कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांसाठी याआधी 5008 लिपिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती.
त्यासाठी 7 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आता 1673 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच आज 22 सप्टेंबर रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. SBI PO आणि लिपिकाच्या एकूण 6681 पदांसाठी भरतीसाठी अर्ज स्वतंत्रपणे करावे लागतील. उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. (हेही वाचा - Jobs In India: बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी! भारतात 2023 मध्ये 9 दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता)
1673 PO पदांसाठी अर्ज शुल्क, वयोमर्यादा आणि शेवटची तारीख -
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी घेतलेल्या उमेदवारांनी SBI च्या वेबसाइटवरील करिअर विभागात प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी अर्ज करता येईल. या भरतीसाठी उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. 1 एप्रिल 2022 रोजी उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.
5008 लिपिक पदांसाठी अर्ज शुल्क, वयोमर्यादा आणि शेवटची तारीख -
त्याचप्रमाणे, SBI 5008 लिपिक पदांच्या भरतीसाठी देखील अर्ज मागवत आहे, ज्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर आहे. अर्जासाठी उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागेल.