Railway Recruitment 2023: भारतीय रेल्वेत प्रशिक्षणार्थी 4103 पदांसाठी भरती; AC मेकॅनिक, सुतार, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, पेंटर करु शकतात अर्ज

दक्षिण मध्य रेल्वे तब्बल विविध विभागांतील 4103 शिकावू पदासाठी भरती प्रक्रिया राबवत आहे.

Railway Engine (Photo Credit- Wikimedia Commons)

South Central Recruitment 2023: भारतीय रेल्वेत नोकरी (Sarkari Naukri) करण्याचे स्वप्न तुम्ही जर उराशी बाळगून असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. दक्षिण मध्य रेल्वे तब्बल विविध विभागांतील 4103 शिकावू पदासाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. यासाठी अधिसूचना (Government Jobs) निघाली असून, इच्छुक उमेदवारांकून विहित मुदतीत अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार भारतीय रेल्वेने उपलब्ध करुन दिलेल्या संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती घेऊ शकतात. जाणून घ्या कोणत्या विभागात किती पदे?

दक्षिण मध्य रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार , इच्छुक आणि पात्र उमेदवार 29 जानेवारी 2023 पर्यंत आपले अर्ज दाखल करु शकतात. अधिक माहितीसाठी आपण scr.indianrailways.gov.in. या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. (हेही वाचा, Mumbai Local Update: मागील वर्षात मध्य, पश्चिम रेल्वे झोनमध्ये अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर करण्याऱ्या 8,176 लोकांना पकडले, 55.86 लाख रुपयांचा दंड केला वसूल)

कोणकोणत्या पदांसाठी भरती?

AC मेकॅनिक, कारपेंटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, पेंटर पदांसाठी शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करण्यात येत आहे.

कोणत्या विभागासाठी किती पदे?

पात्रता

वरील पदांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ही 30 डिसेंबर 2022 रोजी 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असावी. सरकारी नियमांनुसार राखीव श्रेणीतील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल संपूर्ण माहितीसाठी, तुम्ही अधिसूचना पाहू शकता.

दरम्यान, दक्षिण पूर्व रेल्वेची प्रशिक्षणार्थी भरती प्रक्रिया 2022 साठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुरुवात 30 डिसेंबर 2022 पासून सुरु झाली आहे. पात्र उमेदवार 29 जानेवारी 2023 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. 29 जानेवारी 2023 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मूदत आहे.