NEET 2020 Merit List: नीट युजी परीक्षा निकाल आणि AIR Merit List कशी पहाल ntaneet.nic.in वर ऑनलाईन
NTA NEET UG 2020 परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन पात्र विद्यार्थ्यांना देशातील 15 AIIMS आणि 2 JIPMER मेडिकल कॉळेजमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
NTA NEET UG 2020 Merit List: भारतामध्ये वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी 13 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबर दिवशी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आता जाहीर झाला आहे. काही वेळापूर्वीच नीट युजी 2020 परीक्षेची Final Answer keys of NEET(UG) 2020 आणि त्यापाठोपाठ निकाल जाहीर झाला आहे. मात्र साईटवर तांत्रिक त्रृटींमुळे निकाल पाहण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. आज मेडिकलच्या विद्यार्थ्यांना निकालासोबतच त्यांचं ऑल इंडिया रॅन्किंग देखील पाहता येणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या मनात मेरीट लिस्ट बद्दल कमालीची उत्सुकता आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ntaneet.nic.in आणि nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे आणि याच एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना रॅन्किंगसह मेरीट लिस्ट देखील पाहण्याची सोय आहे. NTA NEET Result 2020: यंदाच्या नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर; ntaneet.nic.in वर पहा मार्क्स, Rank List.
यंदा भारतामध्ये नीट 2020 परीक्षा 3843 नीट एक्झाम सेंटरवर घेण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन पात्र विद्यार्थ्यांना देशातील 15 AIIMS आणि 2 JIPMER मेडिकल कॉळेजमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी आजचा हा NEET result 2020 महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
कशी पहाल NEET 2020 AIR?
- विद्यार्थ्यांना NEET 2020 AIR (All India Ranking) पाहण्यासाठी ntaneet.nic.in ला भेट द्यावी लागणार आहे.
- अॅडमीट कार्ड वरील त्यांचा रोल नंबर एंटर करून निकाल पाहता येईल.
- NEET AIR merit list मध्ये विद्यार्थ्यांच्या नावांचा उल्लेख असतो. नावापुढे रॅकिंग दिलं जातं.
दरम्यान देशातील रॅन्किंग सोबतच प्रत्येकराज्यातूनही मेडिकल अॅडमिशनसाठी एक वेगळी कट ऑफ लिस्ट जारी केली जाते. आता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी National Medical Commission (NMC) च्या काऊंसिल राऊंडसाठी देखील तयार रहायला हवे. आता देशातील टॉप कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची फायनल राऊंड घेऊन निवड केली जाते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)