IPL Auction 2025 Live

UGC NET Result 2021: NTA ने जाहीर केला यूजीसी नेट चा निकाल, 'असा' करा चेक

UGC NET 2021 परीक्षा देशातील 239 शहरांमधील 837 परीक्षा केंद्रांवर 81 विषयांमध्ये घेण्यात आली होती.

Result Representational Image (Photo Credits: File Photo)

UGC NET Result 2021: विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षा, UGC NET निकाल 2021 चा निकाल जाहीर झाला आहे. डिसेंबर 2020 आणि जून 2021 परीक्षांसाठी हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ugcnet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.

UGC NET निकाल 2021 हा त्या परीक्षांसाठी आहे ज्या नोव्हेंबर 2021 ते 5 जानेवारी 2022 या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना घेण्यात आल्या होत्या. (वाचा-ICSE, ISC Term 2 Exams 2022: CISCE च्या दहावी, बारावीच्या टर्म 2 च्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात! )

या स्टेपचा वापर करून तपासा UGC NET Result 2021 चा निकाल -

UGC NET 2021 परीक्षा देशातील 239 शहरांमधील 837 परीक्षा केंद्रांवर 81 विषयांमध्ये घेण्यात आली. JRF साठी UGC NET च्या निकालाची वैधता 3 वर्षे आहे. तसेच सहाय्यक प्राध्यापकासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल आजीवन वैध आहे.