New Courses and Career Options After HSC: बारावीनंतर कला आणि नवीन तंत्रज्ञानाचा मेळ असलेले हटके कोर्सेस पर्याय; उघडतील नव्या करिअरची दारे
आजच्या या लेखात आम्ही अभियांत्रिकी, वैद्यकीय, वकिली असे पारंपारिक कोर्सेस सोडून काही हटके कोर्सेसची माहिती देत आहोत, जे कदाचित तुम्हाला फायद्याचे ठरतील. हे अभ्यासक्रम अभियांत्रिकी किंवा वाणिज्यापेक्षा वेगळे आहेत, कारण यात कला आणि नवीन तंत्रज्ञानाचा मेळ आहे.
New Courses and Career Options After HSC: हायर सेकेंडरी सर्टिफिकेट (HSC) म्हणजेच बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर भारतातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाखेनुसार- विज्ञान, वाणिज्य किंवा कला आणि करियरच्या उद्दिष्टांनुसार अनेक अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध होतात. बारावीनंतरचा हा टप्पा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा असतो, कारण येथूनच त्यांचे शिक्षण आणि करियरची दिशा ठरते. आजकाल प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांसाठी विविध व्यावसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रम आहेत, जे त्यांच्या आवडी आणि कौशल्यांवर अवलंबून निवडले जाऊ शकतात. आजच्या या लेखात आम्ही अभियांत्रिकी, वैद्यकीय, वकिली असे पारंपारिक कोर्सेस सोडून काही हटके कोर्सेसची माहिती देत आहोत, जे कदाचित तुम्हाला फायद्याचे ठरतील. हे अभ्यासक्रम अभियांत्रिकी किंवा वाणिज्यापेक्षा वेगळे आहेत, कारण यात कला आणि नवीन तंत्रज्ञानाचा मेळ आहे.
बॅचलर ऑफ ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स (Bachelor of Animation and VFX)-
हा ॲनिमेशन, 3D मॉडेलिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्स शिकवणारा अभ्यासक्रम आहे. याची गेमिंग, चित्रपट (जसे की बाहुबली), डिजिटल कंटेंट क्षेत्रात प्रचंड मागणी आहे. हा एक सर्जनशील आणि तांत्रिक करियर पर्याय असून, यानंतर ॲनिमेटर, व्हीएफएक्स आर्टिस्ट, गेम डिझायनर म्हणून काम करता येते.
बीए इन डिजिटल कंटेंट क्रिएशन (BA in Digital Content Creation)-
आजकाल बीए इन डिजिटल कंटेंट क्रिएशन हा अभ्यासक्रमही सुरु झाला आहे. यूट्यूब, इन्स्टाग्रामसाठी व्हिडिओ, पॉडकास्ट आणि ब्लॉग बनवण्याचे प्रशिक्षण यामध्ये दिले जाते. सोशल मीडियाच्या युगात कंटेंट क्रिएटर्सची मागणी पाहता हा अभ्यासक्रम फायद्याचा ठरू शकतो. यामध्ये स्वतःचा ब्रँड बनवण्याची संधी असून, कंटेंट क्रिएटर, डिजिटल मार्केटर, इन्फ्लुएन्सर म्हणून करियरचे पर्याय आहेत.
बी.एस्सी. इन न्यूट्रिशन आणि डाएटीक्स (B.Sc. in Nutrition and Dietetics)-
हा कोर्स तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना अन्नातील पोषणमूल्य, शरीरातील पोषणतत्त्वांची भूमिका, आहार नियोजन, तसेच विविध आजारांनुसार आहार कसा असावा याचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले जाते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी हॉस्पिटल, फिटनेस सेंटर्स, किंवा स्वतःचा डाएट कन्सल्टिंग व्यवसाय सुरू करू शकतात. स्पोर्ट्स न्यूट्रिशन, क्लिनिकल डाएटेटिक्स, आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन यासारख्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळते. (हेही वाचा: High Salary Career Options After 12th Science for Girls: बारावी सायन्स झाल्यावर मुलींसाठी गलेलठ्ठ पगारांसठी करीअर पर्याय; घ्या जाणून)
फॅशन डिझाईन (Fashion Design)-
आजकाल सोशल मिडियामुळे फॅशनची मागणी वाढतेय. त्यामुळे या क्षेत्रातील कोर्सनंतर अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील. हा कोर्स फॅशन आणि स्टाईलच्या जगात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे. या कोर्समध्ये कपड्यांचे डिझाईन, टेक्स्टाईल्सचे प्रकार, रंगसंगती, सिल्हूट डेव्हलपमेंट आणि फॅशन इंडस्ट्रीतील नवीन ट्रेंड्स यांचा अभ्यास केला जातो. यामधून विद्यार्थी स्वतःचे फॅशन ब्रँड सुरू करू शकतात किंवा एखाद्या मोठ्या फॅशन हाऊससाठी डिझायनर, स्टायलिस्ट, फॅशन कन्सल्टंट म्हणून काम करू शकतात.
सायबर सिक्युरिटी (Cyber Security)-
सध्या हे नव्याने उदयास येत असलेले क्षेत्र आहे. इंटरनेट, मोबाइल, वेबसाइट्स यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सिस्टिम्समधील कमजोरी शोधून ती दुरुस्त करणे हे यामध्ये शिकवले जाते. तसेच हॅकर्सना रोखण्यासाठी देखील प्रशिक्षण दिले जाते. सायन्स + कॉम्प्युटरचा बेस असलेल्या मुलांसाठी याचा फताडा होईल. यानंतर आयटी कंपन्या, बँका, सरकारी संस्था, सायबर क्राईम विभाग, फ्रीलान्स सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
याशिवाय डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझाइन, वेब डेव्हलपमेंट, हॉटेल मॅनेजमेंट किंवा फोटोग्राफी यांसारखे डिप्लोमा कोर्सेस एक ते दोन वर्षांत पूर्ण होतात आणि नोकरीच्या संधी देतात. बारावीनंतर अभ्यासक्रम निवडताना विद्यार्थ्यांनी आपली आवड, आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातील उद्दिष्टे यांचा विचार करावा. काही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात, तर काही थेट गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश देतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)