NEET UG 2024 Re-Exam Result: NTA कडून आज नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची शक्यता; exams.nta.ac.in वर पहा स्कोअरकार्ड

आज त्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

नीट । Representative Image

National Testing Agency कडून आज NEET UG 2024 च्या पुर्नपरीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. https://exams.nta.ac.in/NEET/ या संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाणार आहे. 1563 विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात आली होती. ग्रेस मार्क्स देण्यावरून झालेल्या वादानंतर या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर निकालाला आव्हान देत कोर्टात प्रकरण पोहचल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ग्रेस मार्क्स सोडून मार्क्स स्वीकारा अन्यथा पुन्हा परीक्षा द्या असे पर्याय दिले. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांमधून 813 जणांनी पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. ही परीक्षा 23 जून दिवशी घेण्यात आली होती.

NEET UG 2024 exam चा 4 जूनला पहिल्यांदा निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र त्यावरून देशभर आक्षेप घेत काही हरकती घेण्यात आल्या. पेपर लीक झाल्याच्या तसेच अनेकांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्यावरून आक्षेप नोंदवण्यात आले होते. Ministry of Education कडून सीबीआय काडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले. NEET, UGC-NET Controversies: एनईईटी, यूजीसी-नेट परीक्षा वादानंतर केंद्राचा मोठा निर्णय, Public Examinations Act, 2024 लागू. 

NEET UG 2024 Re-Exam निकाल कसा पहाल?

NEET UG 2024 परीक्षा प्रक्रियेच्या सुरू असलेल्या छाननीदरम्यान पुन्हा चाचणी निकालांची ही घोषणा करण्यात आली आहे. सीबीआय तपासाचा अंतिम निकाल आणि परीक्षेच्या अखंडतेवर आणि भविष्यावर त्याचा संभाव्य परिणाम पाहणे बाकी आहे.