NEET UG 2023 Registration: नीट यूजी नोंदणी आजपासून पुन्हा 3 दिवसांसाठी खुली; neet.nta.nic.in वर करा अर्ज
NEET परीक्षा आता इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दूसह 13 भाषांमध्ये देता येणार आहे.
नॅशनल टेस्टिंग एजेंसी (National Testing Agency) कडून अखेर National Eligibility cum Entrance Test for Undergraduate (NEET UG) 2023 अर्थात नीट युजी परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ द्देण्यात आली आहे. आज 11 एप्रिलपासून पुन्हा रजिस्ट्रेशनसाठी विंडो खुली केली जाणार आहे. ज्यांना यंदाची नीट परीक्षा द्यायची आहे त्यांना अजूनही परीक्षेसाठी नोंदणी करण्याकरिता 2 दिवसांचा अवधी मिळाला आहे. NTA ची अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर जाऊन विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. नक्की वाचा: NTA Examination Calendar for Academic Year 2023-24: एनटीए कडून JEE Main, NEET UG, CUET परीक्षांच्या तारखा जाहीर .
कसा कराल अर्ज?
- NEET (UG)ची वेबसाईट neet.nta.nic.in वर भेट द्या.
- रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये सारे डिटेल्स भरा.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल तो नमूद करून घ्या.
- आता तुमच्या अॅप्लिकेशन नंबर, पासवर्ड सह फॉर्म भरा
- आता परीक्षा केंद्राचा पसंती क्रम, मिडियम आणि खाजगी माहिती यांची माहिती भरा.
- तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- आता अॅप्लिकेशन फी भरा.
- कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करून सेव्ह करा, प्रिंट करा.
परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांना अर्ज शुल्क भरावे लागेल. सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांना 1,600 रुपये, तर EWS आणि OBC श्रेणीतील विद्यार्थ्यांना 1,500 रुपये भरावे लागतील, तर SC, ST, PwD आणि तृतीय लिंगासाठी 900 रुपये शुल्क भरावे लागेल.
NEET परीक्षा आता इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दूसह 13 भाषांमध्ये आयोजित केली जाते. दरवर्षी 15 ते 18 लाखांहून अधिक उमेदवार वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसतात.