IPL Auction 2025 Live

NEET PG Score Card 2021: आज NBE कडून पुन्हा जारी होणार स्कोअर कार्ड; nbe.edu.in वरून करा डाऊनलोड

NBE च्या ऑफिशिअल नोटीफिकेशन नुसार, पूर्वीचं स्कोअर कार्ड रद्दबातल ठरवण्यात आलं आहे.

Representational Image (Photo Credits: pixabay)

नॅशनल एलिजिबिलीटी कम एंटरंस टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट किंवा नीट पीजी स्कोअर कार्ड 2021 (NEET PG Score Card) ऑक्टोबर 14 म्हणजे आज प्रसिद्ध करणार आहे. National Board of Examination कडून आता विद्यार्थ्यांचं वैयक्तिक स्कोअरकार्ड प्रसिद्ध केले जाणार आहे. नीट पीजी 2021 चा निकाल 28 सप्टेंबरलाच National Board of Examination in Medical Science कडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स nbe.edu.in वर पाहता येणार आहेत. Colleges To Reopen In Maharashtra: राज्यात 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार सारी महाविद्यालयं; उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय .

NBE कडून 8 ऑक्टोबरलाच स्कोअर कार्ड करण्यात आले आहे. पण OBC, SC, ST, General PwD Category Candidates च्या कट ऑफ स्कोअर आणि टायपोलॉजिकल एरर मुळे आता NBE कडून पुन्हा अपडेटेड स्कोअर कार्ड दिले जात आहे. यामध्ये कट ऑफ यादी दुरूस्त केली जाईल. स्कोअर कार्ड वर विद्यार्थ्याने मिळवलेले मार्क्स पाहता येणार आहेत.

NEET PG Score Card 2021 डाऊनलोड कसं कराल?

NBE च्या ऑफिशिअल नोटीफिकेशन नुसार, पूर्वीचं स्कोअर कार्ड रद्दबातल ठरवण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आज जारी करण्यात आलेलं नीट पीजी स्कोअर कार्ड 2021 ग्राह्य धरलं जाणार आहे.