NEET PG 2024 Revised Exam Date: नीट पीजी 2024 च्या परीक्षेसाठी नवी तारीख जाहीर

Exam (PC - pixabay)

National Medical Commission कडून NEET PG 2024 ची नवी परीक्षा तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा आता 23 जून 2024 दिवशी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 7 जुलै दिवशी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 15 जुलै दिवशी जाहीर केला जाणार आहे. दरम्यान यासाठी काऊंसिल प्रोसेस 5 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर दरम्यान चालणार आहे.

परीक्षेत 200 MCQ प्रश्नांचा समावेश आहे आणि प्रत्येक प्रश्नात फक्त इंग्रजी भाषेत 4 response options आहेत. उमेदवारांनी प्रत्येक प्रश्नामध्ये दिलेल्या 4 response options पैकी योग्य उत्तर निवडणे आवश्यक आहे. परीक्षा पूर्ण करण्यासाठी दिलेला वेळ 3 तास 30 मिनिटे आहे.

NEET PG 2024 साठी कसा कराल अर्ज?

तुमचं परीक्षा केंद्र निवडा आणि तुमच्या अ‍ॅप्लिकेशनची कॉपी प्रिंट आऊट काढून तुमच्या जवळ ठेवा. सध्या देशात लोकसभा निवडणूकांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आल्याने मे महिन्यात होणार्‍या सीए आणि यूपीएससी च्या परीक्षांमध्येही बदल करण्यात आले आहेत.