NEET PG 2024 Admit Card Release Date: आज NBEMS जारी करणार हॉल तिकीट्स; nbe.edu.in वरून अशी करा डाऊनलोड्स

Online | Pixabay.com

NBEMS अर्थात नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायंस कडून आज (8 ऑगस्ट) NEET PG 2024 ची अ‍ॅडमीट कार्ड्स जारी केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना ही अ‍ॅडमीट कार्ड्स nbe.edu.in या NBEMS च्या अधिकृत वेबसाईट वरून डाऊनलोड करता येणार आहे. यंदा या परीक्षेचं आयोजन 23 जून दिवशी केलं होतं पण ही परीक्षा 11 ऑगस्ट 2024 दिवशी दोन शिफ्ट मध्ये आयोजित करण्यात आली आहे. अन्य स्पर्धा परीक्षांच्या तारखा या दिवशी येत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. NEET PG 2024 ची परीक्षा पुढे ढकलण्याची ही चौथी वेळ आहे.

जारी नोटीसनुसार, NEET PG 2024 परीक्षा देशभरातील 185 चाचणी शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. नोटीसमध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की 23 जून रोजी शेड्यूल केलेल्या NEET-PG 2024 साठी यापूर्वी जारी केलेल्या प्रवेश पत्रांमध्ये दिलेलं परीक्षा  शहर आणि परीक्षा केंद्र यापुढे वैध नाहीत.

NEET PG 2024 Admit Card कसं कराल डाऊनलोड?

परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना त्यांच्या अ‍ॅडमीट कार्डची प्रिंटेड कॉपी सोबत ठेवणं आवश्यक आहे. दरम्यान त्यासोबत वैध ओळखपत्र देखील असणं आवश्यक आहे. एका दिवसामध्ये आणि एका सेशन मध्ये ही परीक्षा होणार आहे. दरम्यान ही परीक्षा CBT mode मध्ये होणार आहे. एकूण 200 मार्कांची प्रश्नपत्रिका असते. multiple-choice questions असणार आहेत. चारपैकी योग्य पर्याय विद्यार्थ्यांना निवडावे लागणार आहेत. यामध्ये परीक्षा 3 तास 30 मिनिटांची असणार आहे.



संबंधित बातम्या