NEET UG Result Date 2025: NTA 14 जून पर्यंत जाहीर करणार NEET UG Final Answer Key, निकाल; neet.nta.nic.in वर कसा पहाल मार्क्स
neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे स्कोअरकार्ड आणि Qualifying Status तपासू शकतात.
National Testing Agency कडून NEET UG 2025 चा निकाल 14 जून पर्यंत जाहीर होणार आहे. एनटीए कडून final answer key जाहीर केली आहे. 22.7 लाख या परीक्षेला सामोरे गेले आहेत त्यामुळे आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे. 4 मे दिवशी झालेल्या या परीक्षेमध्ये 5453 परीक्षा केंद्र होती. उमेदवार त्यांचा application number आणि पासवर्ड वापरून neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे स्कोअरकार्ड आणि Qualifying Status तपासू शकतात. विषय तज्ञांकडून सध्या रिव्ह्यू असलेल्या अंतिम आन्सर कीच्या आधारे निकाल बनवला आहे. 3 जून रोजी प्रकाशित झालेल्या Provisional Key मध्ये उमेदवारांना प्रति प्रश्न 200 रुपये भरून 5 जूनपर्यंत आक्षेप नोंदवण्याची परवानगी होती. वैध आक्षेप अंतिम आवृत्तीत समाविष्ट केले जातील.
NEET UG 2025 Result कसा पहाल ऑनलाईन?
- neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- NEET UG 2025 result च्या लिंक वर क्लिक करा.
- Enter application number आणि password टाका.
- तुमचा निकाल स्क्रिनवर पहा.
- पीडीएफ स्वरूपातील निकाल पहा आणि डाऊनलोड करा.
निकाल जाहीर झाल्यानंतर, पात्र उमेदवार भारतातील वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी NEET UG 2025 समुपदेशन प्रक्रियेसाठी नोंदणी करू शकतात.
दरम्यान, चेन्नईतील निवडक केंद्रांवर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करणाऱ्या याचिका मद्रास उच्च न्यायालयाने 6 जून रोजी फेटाळून लावल्या. न्यायमूर्ती सी. कुमारप्पन यांनी निकाल दिला की हे व्यत्यय "लोकलाईज्ड आणि किरकोळ" आहेत आणि पुनर्परीक्षेचा आदेश देणे बहुसंख्य उमेदवारांसाठी अन्याय्य ठरेल. यामुळे NEET UG 2025 चा निकाल वेळेवर जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 3613 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

