NCERT Textbooks: एनसीईआरटी द्वारे पाठ्यपुस्तकांमध्ये बदल; इयत्ता 12 वी इतिहासातून मुघल साम्राज्यावरील धडा हटवला
खास करुन इयत्ता 12 इतिहास विषयाच्या पुस्तकातून मुघल साम्राज्याच्या इतिहासासंदर्भातील धडे आणि तपशील हटविण्यात आला आहे. परिणामी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे.
NCERT Class 12th History Curriculum: केंद्र सरकारचे शैक्षणिक धोरण आणि त्यासंदर्भात सरकारी संस्थांनी घेतलेले निर्णय, केलेली अंमबजावणी यांवरुन आगोदच वाद सुरु आहेत. त्यातच आता एनसीआरटी (NCERT) द्वारा इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमातील (NCERT Curriculum) पाठ्यपुस्तकांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. खास करुन इयत्ता 12 इतिहास विषयाच्या पुस्तकातून मुघल साम्राज्याच्या इतिहासासंदर्भातील धडे आणि तपशील हटविण्यात आला आहे. परिणामी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे.
सांगतले जात आहे की, NCERT ने केलेल्या बदलांचा परिणाम म CBSE, UP, आणि NCERT अभ्यासक्रमाचे पालन करणाऱ्या इतर राज्य मंडळांसह सर्व बोर्डांच्या अभ्यासक्रमांवर होणार आहे. त्यामुळे इतही मंडलांना आपापल्या अभ्यासक्रमांमध्ये बदल करावा लागणार आहे. नवा आणि सुधारीत अभ्यासक्रम 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी लागू केला जाईल.
NCERT अंतर्गत येणाऱ्या मंडळांच्या इयत्ता 12 वीच्या अद्ययावत अभ्यासक्रमात Themes of Indian History-Part II मधील मुघल साम्राज्याच्या अनुषंघाने येणारा भाग वगळण्यात आला आहे. या भागात 16वे आणि 17वे शतकातील मुघल साम्राज्याबद्दल धडे होते. (हेही वाचा, Shocking: विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ! देशभरातील 695 विद्यापीठे आणि 34,000 हून अधिक महाविद्यालये NAAC मान्यताविना कार्यरत)
दरम्यान, केवळ इतिहासच नव्हे तर इयत्ता 12 वीचे नागरिकशास्त्राचे पुस्तकही अद्ययावत केले आहे. या पुस्तकातील 'जागतिक राजकारणातील अमेरिकेचे वर्चस्व' आणि 'शीतयुद्धाचा काळ' यासारखे धडे काढून टाकण्यात आले आहेत. यासोबतच 'लोक चळवळीचा उदय' आणि 'एकपक्षीय वर्चस्वाचे युग' हे प्रकरणही बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून काढून टाकण्यात आले आहेत.
एनसीईआरटीने काही पाठ्यपुस्तके वगळून इयत्ता 10वी आणि 11वीच्या अभ्यासक्रमातही सुधारणा केली आहे. इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकातून 'जागतिक इतिहासातील संकल्पना', 'मध्य इस्लामिक भूमी', 'संस्कृतींचा संघर्ष' आणि 'औद्योगिक क्रांती' यासारखे अध्याय काढून टाकण्यात आले आहेत. 'लोकशाही आणि विविधता', 'लोकप्रिय उठाव आणि चळवळ' आणि 'लोकशाहीसमोरील आव्हाने' हे प्रकरण इयत्ता 10वीच्या 'डेमोक्रेटिक पॉलिटिक्स-2' च्या पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आले आहेत.