JEE (Main), NEET 2020 Exam Date and Schedule: जेईई (मुख्य) परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान, तर नीट (युजी) ची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी आयोजित; NTA कडून परिपत्रक जारी
विद्यार्थ्यांची शैक्षणिक आवड पाहता या परीक्षा आता, जेईई (मुख्य) – 1 सप्टेंबर 2020 ते 6 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये होणार आहे व नेट (युजी) 13 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून JEE (Main) आणि NEET (UG), परीक्षा ज्या पूर्वी जुलै महिन्यात होणार होत्या, त्या आता पुढे ढकलून सप्टेंबर 2020 मध्ये आयोजित केल्या आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक आवड पाहता या परीक्षा आता, जेईई (मुख्य) – 1 सप्टेंबर 2020 ते 6 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये होणार आहे व नीट (युजी) 13 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे. एनटीए (National Testing Agency) आता याबाबत परिपत्रक जारी केले आहे. याआधी सुप्रीम कोर्टानेही निकाल देत, या परीक्षा अजून पुढे ढकलण्यात येणार नसल्याचे सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर एनटीएने जेईई (मुख्य) परीक्षेची प्रवेशपत्रे जारी केली आहेत. नीट (यूजी) 2020 चे प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. एनटीएने या गोष्टीची खात्री केली आहे की, 99% पेक्षा जास्त उमेदवारांना त्यांच्या पहिल्या पसंतीची शहर केंद्रे मिळतील. जेईई मेनसाठी परीक्षा केंद्रांची संख्याही 570 वरून 660 करण्यात आली आहे, तर नीट (यूजी) साठी ही संख्या 2546 वरून 3843 इतकी करण्यात आली आहे. जेईई मेन ही संगणक आधारित चाचणी (CBT) आणि नीट (यूजी) ही पेन पेपर-आधारित चाचणी आहे.
एएन आय ट्वीट -
जेईई (मुख्य) आणि साठी 8.58 लाख आणि नीटसाठी 15.97 लाख उमेदवारांची नोंदणी झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा हॉलमध्ये योग्य सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी जेईई (मुख्य) परीक्षेमध्ये उमेदवार ठराविक आंतर ठेऊन बसतील. NEET च्या बाबतीत प्रति कक्ष उमेदवारांची संख्या आधीच्या 24 वरून 12 करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि कर्मचारी यांच्या शरीराचे तापमान मोजले जाईल. ज्या विद्यार्थ्यांचे तापमान 37.4C/99.4F पेक्षा कमी आहे केवळ त्यांनाच परीक्षा केंद्रात जाण्याची परवानगी दिली जाईल.
सर्व मुलांना परीक्षा केंद्रात नवीन तीन प्लाय फेस मास्क आणि ग्लोव्हज दिले जातील, जे परिधान करणे बंधनकारक असेल. घरातून घालुने आलेल मास्क आणि हातमोजे काढावे लागतील. याशिवाय परीक्षा केंद्रात पाण्याची व्यवस्था नसल्याने सर्व उमेदवारांना घरातून पारदर्शक बाटलीत पाणी आणण्यास सांगितले गेले आहे. (हेही वाचा: सोनू सूदची शिक्षण मंत्रालय, पीएमओला कडे जेईई व नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; 'विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात घालू नये')
एनटीएने विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारांना पत्र देखील लिहिले आहे, त्यायोगे उमेदवारांचे परीक्षा केंद्रांवर पोहोचणे सुनिश्चित केले जाईल.