Mumbai University IDOL Exams 2020: मुंबई विद्यापीठ 'आयडॉल' अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षा पुढे ढकलल्या
त्यामुळे विद्यापीठातच संलग्न महाविद्यालयांच्या तुलनेत काय समस्या आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. विद्यापीठिाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थी संघटनांसोबतच शिक्षक संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांचा आगोदर सुरु असलेला घोळ मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) पुन्हा एकदा कायम ठेवला आहे. मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) अंतिम वर्षाच्या परीक्षा आज (मंगळवार, 8 ऑक्टोबर 2020) पुन्हा एकदा लांबणीवर (Mumbai University IDOL Exam 2020 Postponed) टाकाव्या लागल्या आहेत. दूर आणि मुक्त अध्ययन संस्था अर्थात आयडॉल (IDOL) परीक्षा ऑनलाईन माध्यमातून घेतल्या जाणार होत्या. परंतू, सातत्याने निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे या परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनाला टाळता आली नाही. विशेष म्हणजे 3 ऑक्टोबरलाही या परीक्षा लांबणीवर टाकत पुढची तारीख देण्यात आली होती. विद्यापीठाने आज पुन्हा एकदा टीवायबीए आणि टीवाय बीकॉमची दुपारी 1 ते 2 या वेळात घेतली जाणारी नियोजीत परीक्षा पुढे ढकलली.
दूर आणि मुक्त अध्ययन संस्था अर्थात आयडॉलमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा तांत्रिक अडचणींचे कारण देत मुंबई विद्यापीठ वारंवार पुढे ढकलत आहे. त्यामुळे परीक्षार्थींना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच, परीक्षार्थिंनी परीक्षेच्या दृष्टीने केलेले व्यवस्थापनही कोलमडत आहे.विद्यार्थ्यांचा वेळ नाहक वाया जातो आहे. शिवाय परीक्षेसाठी घेतलेले इतर श्रमही वाया जात आहेत. विद्यार्थ्यांना कारणाशिवया आरोग्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी परीक्षांचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने केले जात असताना या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे पुढे येत आहे. (हेही वाचा, JEE Advanced 2020 Results Declared: जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल jeeadv.ac.in वर जाहीर; इथे पहा स्कोअर कार्ड, All India Rankings)
दरम्यान, विद्यापीठाच्या इतर संलग्न महाविद्यालयांमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ऑनलाईन असूनही सुरळीत पार पडत आहेत. त्यामुळे विद्यापीठातच संलग्न महाविद्यालयांच्या तुलनेत काय समस्या आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. विद्यापीठिाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थी संघटनांसोबतच शिक्षक संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.