MPSC Exam: कोरोना काळात 21 मार्चला होणार राज्य सेवा पूर्व परीक्षा; उमेदवारांसाठी सूचना जारी; पीपीई किटही उपलब्ध करून देण्याची सोय   

यापूर्वी ही परीक्षा 14 मार्च रोजी घेण्यात येणार होती, मात्र 11 मार्च रोजी पुन्हा परीक्षेचे वेळापत्रक बदलले. मदत व पुनर्वसन विभागाने एका परिपत्रकात जाहीर केलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला होता.

MPSC Exam | Image used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay.Com)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्य सेवा प्रिलिम्सची परीक्षा 21 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 14 मार्च रोजी घेण्यात येणार होती, मात्र 11 मार्च रोजी पुन्हा परीक्षेचे वेळापत्रक बदलले. मदत व पुनर्वसन विभागाने एका परिपत्रकात जाहीर केलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर 12 मार्च रोजी आयोगाकडून कळविण्यात आले की 21 मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होत असताना ही परीक्षा होणार आहे, त्यामुळे प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांसाठी परीक्षा दिशानिर्देश जारी केले आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांकरीता आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार उमेदवारांना खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे-

दरम्यान, 14 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांना आधीच प्रवेशपत्रे देण्यात आली होती. मात्र परीक्षेची तारीख बदलल्यानंतर आयोगाने म्हटले होते की, परीक्षा 21 मार्च रोजी संपूर्ण राज्यभर त्याच केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी आधीच मिळालेले हॉल तिकीट हे 21 मार्चच्या परीक्षेला वैध मानले जाईल.