MHT CET 2025 Result Date Update: MHT-CET-PCM/ PCB, LLB 5 Yr-CET पहा या 5 महत्त्वाच्या सीईटी परीक्षांचे निकाल कधी? सीईटी सेल ने जाहीर केल्या संभाव्य तारखा

MHT CET 2025 परीक्षेत पात्र होण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 200 पैकी किमान 90 गुण मिळवणे आवश्यक आहे. SC, ST, OBC आणि PwD श्रेणीतील उमेदवारांसाठी, 200 पैकी किमान 80 गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहेत.

MHT CET 2025 Result Date Update: MHT-CET-PCM/ PCB,  LLB 5 Yr-CET पहा या 5 महत्त्वाच्या सीईटी परीक्षांचे निकाल कधी? सीईटी सेल ने जाहीर केल्या संभाव्य तारखा
Students| Pixabay.com

पदवीच्या शिक्षणासाठी पुढील प्रवेशप्रक्रियेत Maharashtra CET cell कडून घेण्यात येणार्‍या सीईटी च्या परीक्षा महत्त्वाच्या असतात. सध्या अभियांत्रिकी, कृषी, फार्मसी आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांच्या निकालाचे वेध लागले आहेत. दरम्यान नुकतेच Maharashtra CET cell ने एक परिपत्रक जारी करत MHT CET 2025 PCM आणि PCB groups सह तीन आणि पाच वर्षांच्या एलएलबी साठी देखील आवश्यक सीईटीच्या परीक्षांचे निकाल कधी लागणार याची माहिती दिली आहे. cetcell.mahacet.org या सेलच्या अधिकृत वेबसाईट वर लवकरच निकाल केले जाणार आहे. या तारखा संभाव्य तारखा म्हणून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या तारखांमध्ये बदल होऊ शकतात.

Maharashtra CET cell च्या परिपत्रकानुसार, B.BCA/BBA/BMS/BBM-CET आणि LLB 5 Yr-CET यांचे निकाल संभाव्य तारखेनुसार 4 जून 2025 दिवशी जाहीर केले जाऊ शकतात तर B.Design-CET चा निकाल 9 जून आणि MHT-CET-PCB,

MHT-CET-PCM चा निकाल 16 जून आणि LLB 3 Yr-CET परीक्षेचा निकाल 17 जून दिवशी जाहीर केला जाईल. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन .

कसा पहाल सीईटी सेल वर निकाल?

  • cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • होम पेज वर ‘CET Result 2025’ वर क्लिक करा.
  • स्क्रीन वर नवी लॉगिन विंडो उघडेल.
  • तुमचा रजिस्टर इमेल आयडी आणि पासवर्ड टाका.
  • आता MHT CET 2025 result तुमच्या स्क्रीन वर दिसणार आहे.
  • तुमचं स्कोअरकार्ड पहा आणि डाऊनलोड करा.

MHT CET 2025 PCM च्या निकालात उमेदवाराचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितातील गुण आणि एकूण टक्केवारी गुण समाविष्ट असतील.  तर PCB मध्ये  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि बायोलॉजीचा समावेश असेल.  MHT CET 2025 च्या निकालासोबतच, टॉपर्सची यादी देखील अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).