MHT CET 2021 Online Correction Window आज होणार बंद; पहा mahacet.org वर कसे कराल अर्जात बदल?
ही कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा असेल
महाराष्ट्र स्टेट कॉमन एन्टरंस टेस्ट सेल ( Maharashtra State Common Entrance Test Cell) कडून सुरू करण्यात आलेली यंदाची ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया आज (16 ऑगस्ट) ला बंद होणार आहेत. वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार, MHT CET 2021 साठी यंदा अर्ज केलेल्यांना त्यांच्या फॉर्म मध्ये बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामध्ये नाव, फोटो, स्वाक्षरी आणि परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक विद्यार्थ्यांना सीईटीचे फॉर्म भरता आले नव्हते. त्यामुळेच 14 ऑगस्ट पासून ही वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात आली होती आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एक संधी देण्यात आली होती.
सीईटी 2021 च्या प्रवेश अर्जात कसा कराल बदल?
- अधिकृत वेबसाईट mahacet.org ला भेट द्या.
- होम पेजवर 'MHT CET 2021' वर क्लिक करा.
- आता स्क्रिनवर नवीन पेज ओपन होईल.
- तुम्हांला विचारलेले credentials टाका.
- 'Edit my application link'या पर्यायावर क्लिक करा.
- आवश्यक बदल करून आता तुम्ही अर्ज दाखल करू शकता.
MHT CET 2021 ची परीक्षा यावर्षी 4 ते 10 सप्टेंबर आणि 14 ते 20 सप्टेंबर मध्ये होणार आहे. ही कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा असेल. 3 तासात विद्यार्थ्यांना 150 बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. MHT CET 2021 परीक्षा स्टेट कॉमन एन्ट्रन्स सेल, मुंबई कडून घेतली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून विविध व्यावसायिक UG आणि PG अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिले जातात.