Maharashtra Board Supplementary Exam 2024: 10वी, 12वीच्या महाराष्ट्र बोर्ड पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड SSC आणि HSC पुरवणी परीक्षा 2024 च्या तारखा जाहीर केल्या आहेत.परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित केल्या गेल्या आहेत

Students (PC - Twitter)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड SSC आणि HSC पुरवणी परीक्षा 2024 च्या तारखा जाहीर केल्या आहेत.परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित केल्या गेल्या आहेत. विद्यार्थी  mahahsscboard.in वर वेळापत्रक पाहू शकतात.डेटशीटनुसार, इयत्ता 10वीच्या पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होतील आणि 30 जुलै 2024 रोजी संपतील.ह्या परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतल्या जातील. पहिली शिफ्ट सकाळी 11 ते दुपारी 2 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते संध्याकाळी 6 आहे. इयत्ता 12वी सामान्य आणि बायफोकल अभ्यासक्रमांसाठी, परीक्षा 16 जुलै रोजी सुरू होतील,  त्या देखील दुहेरी शिफ्ट वेळापत्रकानुसार 8 ऑगस्ट 2024 पर्यंत चालतील.हेही वाचा: Maharashtra HSC Supplementary Exam: बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज 27 मे पासून ऑनलाईन पद्धतीने भरता येणार; जाणून घ्या महत्वाच्या तारखा

स्टेप टु डाऊनलोड SSC आणि HSC पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रक:

१: mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला विजिट करा.

२: मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र बोर्ड SSC, HSC पुरवणी परीक्षा 2024 तारीख पत्रकासाठी लिंकवर क्लिक करा.

३:परीक्षेच्या तारखांसह एक नवीन PDF फाइल उघडेल.

४:सबमिट वर क्लिक करा आणि PDF डाउनलोड करा.

महाराष्ट्र HSC चा निकाल 21 मे, आणि SSC चा निकाल 27 मे 2024 रोजी जाहीर झाला. यावर्षी, इयत्ता 10 वी साठी एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 93.37% होती, 1,423,923 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि 1,329,684 उत्तीर्ण झाले होते. SSC परीक्षेसाठी, 16,00,021 परीक्षेला बसले आणि 15,17,802 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, परिणामी उत्तीर्णतेची टक्केवारी 94.86% आहे.



संबंधित बातम्या