Maharashtra Board HSC Result 2024 Announced: बारावीचा ऑनलाईन निकाल mahresult.nic.in वर जाहीर; असे पहा मार्क्स

बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि आईचं नाव टाकून तुम्ही निकाल पाहू शकाल.

HSC Result | Twitter

महाराष्ट्र बोर्डाकडून आज 12वीचा निकाल (MSBSHSE HSC Result)  जाहीर झाला आहे. यंदाच्या वर्षी 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांचे ऑनलाईन निकाल देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर पाहता येणार आहे. सोबतच hscresult.mkcl.org,  mahahsscboard.in, results.digilocker.gov.in, results.targetpublications.org, tv9marathi.com या संकेतस्थळांवरही निकाल पाहता येणार आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार यंदा बारावीची परीक्षा 14,23,970 विद्यार्थ्यांनी दिली होती त्यापैकी 13,29,684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. MSBSHSE 12th Results on DigiLocker: महाराष्ट्र बोर्डचा 12वीचा निकाल यंदा डिजीलॉकर वरही उपलब्ध; digilocker.gov.in, DigiLocker App वर असे पहा मार्क्स! 

बारावीचा ऑनलाईन निकाल कसा पहाल?

MSBSHSE कडून जाहीर करण्यात आलेला ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि आईचं नाव हे तपशील टाकायचे आहेत.

Maharashtra Board 12th Results 2024: बारावीच्या निकालावर नाखुष विद्यार्थी Revaluation, Photocopy साठी 22 मे पासून verification.mh-hsc.ac.in वरून करू शकणार अर्ज; पहा फी किती? 

विद्यार्थ्यांसाठी श्रेणीसुधार परीक्षा जुलै महिन्यात आयोजित करण्यात आली असल्याचं बोर्डाने सांगितले आहे. तर गुणांची फेर पडताळणी, उत्तरपत्रिका फोटोकॉपी, उत्तर पत्रिका पुन्हा तपासणी यासाठी verification.mh-hsc.ac.in ला भेट देऊन अर्ज करता येईल. ही सुविधा सशुल्क आहे. 22मे 2024 ते 5 जून 2024 पर्यं विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी  किंवा उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी घेण्यासाठी वेळ देण्यात आली आहे.