Maharashtra Board HSC Result 2021: उद्या दुपारी 4 वाजता जाहीर होणार महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वी चा निकाल; जाणून घ्या कुठे पाहू शकाल
शासन निर्णयाप्रमाणे मूल्यमापन कार्यपध्दती तसेच मंडळाच्या सूचनांनुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी परीक्षा सन 2021 चा निकाल मंडळामार्फत तयार करण्यात आलेला आहे
अखेर महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीच्या निकालाची (Maharashtra Board HSC Result 2021) तारीख जाहीर झाली आहे. शासन निर्णयाप्रमाणे मूल्यमापन कार्यपध्दती तसेच मंडळाच्या सूचनांनुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी परीक्षा सन 2021 चा निकाल मंडळामार्फत तयार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत 2021 मध्ये उच्च माध्यमिक 12 परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार, अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे-
https://hscresult.11thadmission.org.in
https://msbshse.co.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in.
https://lokmat.news18.com
www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
2021 मध्ये आयोजित करण्यात आलेली 12 वी परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे, शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व 10 वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, 11 वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व 12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच 12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे 12 साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे.
सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे. 2 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार 2021 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक /दोन संधी उपलब्ध राहतील.