Maharashtra Board Class 10 Admit Card 2024: आजपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट mahahsscboard.in वर उपलब्ध; असं करा डाऊनलोड!

ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहे.

Online | Pixabay.com

Maharashtra Board SSC Admit Card 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या (Maharashtra Board SSC Exam) विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन माध्यमातून त्यांचे बोर्ड परीक्षेचे अ‍ॅडमिड कार्ड (Admit Card) अर्थात हॉल तिकीट (Hall Ticket) उपलब्ध होणार आहे. परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांसोबत हे हॉल तिकीट असणं आवश्यक आहे. त्यामुळे आजपासून उपलब्ध असलेले हॉल तिकीट वेळीच ताब्यात घेऊन त्यावर छापलेले तपशील अचूक आहे की नाही हे तपासून पाहणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे लॉगिन डिटेल्स जसे की रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख भरून त्यांचे महाराष्ट्र बोर्ड दहावीचे अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.

MSBSHSE notification नुसार, जर हॉल तिकीट वर विषय किंवा मीडीयम मध्ये काही बदल असल्यास शाळांना डिव्हिजनल बोर्ड कडे जाऊन त्याचे बदल करून घ्यावे लागतील असं सांगण्यात आले आहे. Maharashtra Board Exams 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी यंदाही परीक्षेला 10 मिनिटं अधिक मिळणार .

Maharashtra SSC Admit Card 2024 कसं कराल डाऊनलोड?

बोर्डाच्या वेळापत्रकानुसार, दहावीची परीक्षा यंदा 1 मार्च ते 26 मार्च दरम्यान होणार आहे. ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहे. सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये परीक्षा होणार आहे. दरम्यान शाळांकडूनच एकत्र हॉलतिकीटं डाऊनलोड करून ती विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना आहेत. तसेच यासाठी शाळा विद्यार्थ्यांकडून पैसे आकारू शकत नाही.