Maharashtra Board 10th Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा आज दहावीचा निकाल DigiLocker कसा पहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप !

यंदा बोर्डाने अधिकृत वेबसाईट आणि अन्य पार्टी वेबसाईट सोबतच डिजीलॉकरही (DigiLocker) महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल पाहण्याची सोय ठेवली आहे.

DigiLocker (PC - google play)

MSBSHSE Class 10th Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची (Maharashtra Board 10th Result) उत्सुकता सध्या शिगेला पोहचली आहे. आज (27 मे ) दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना त्यांची मार्क्सशीटऑनलाईन पाहता येणार आहे. दरम्यान mahresult.nic.in या वेबसाईट सोबतच अन्य वेबसाईट्स वर देखील विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स पाहता येणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयामध्ये 35% गुण आवश्यक आहेत. यंदा बोर्डाने अधिकृत वेबसाईट आणि अन्य पार्टी वेबसाईट सोबतच डिजीलॉकरही (DigiLocker) महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल पाहण्याची सोय ठेवली आहे. मग यंदा डिजीलॉकर च्या माध्यमातून तुमचा निकाल कसा पहायचा हे देखील जाणून घ्या.

DigiLocker वर कसा पहाल यंदाचा दहावीचा निकाल?

डिजिलॉकर ही एक भारत सरकार उपलब्ध करून दिलेली डिजिटल लॉकर सेवा आहे. या सेवेचा उद्देश भारतीय नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक दस्तऐवजासाठी इलेक्ट्रॉनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे. https://results.digilocker.gov.in यावर देखील तुम्हांला आज दहावीचा निकाल पाहता येणार आहे. 11th Admission Process Dates: दहावीच्या निकालापूर्वी 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी तारखा जाहीर; 24 मे पासून भरता येणार भाग 1! 

मागील वर्षी दहावीचा निकाल 2 जून दिवशी जाहीर करण्यात आला होता. यंदा बोर्डाकडून 12वी सोबतच 10वीचा निकाल देखील मे महिन्यातच जाहीर करण्यात आला आहे. आज बोर्डाकडून  दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या एकुण 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे.