Lockdown: लॉकडाऊन काळात देशभरातील शाळा, महाविद्यालयं कशी चालवावीत? UGC समिती अध्यक्ष काय सांगतायत पाहा
ती पद्धत डावलून सातत्याने डिजिटल अथवा ऑनलाईन प्रणालीपर्यंत पोहोचणे काहीसे घाईगडबडीचे ठरेन. पण आजच्या काळात ऑनलाईन शिक्षण ही वेळेची गरज आहे- प्रो. कुहाड
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात देश लॉकडाऊन (Lockdown) आहे. त्यामुळे देशभरातील विद्यापीठं, शाळा, महाविद्यालयं संध्या तरी बंद आहे. त्यामुळे विविध विषय आणि विभागांतील परीक्षा ठप्प आहेत. अशा स्थितीत हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात शाळा, महाविद्यालं आदींमधील परीक्षा कशा घेतल्या जाव्यात, याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission) द्वारा एक समिती गठीत करण्यात आली. यूजीसी (UGC) गठीत समितीने देशभरातील परीक्षा कशा घेतल्या जाव्यात याबाबत काही सूचना केल्या.
विद्यापीठ अनुदान आयोग द्वारा गठीत करण्या आलेल्या समितीचे अध्यक्ष आणि हरियाणा केंद्रीय विद्यापीठाचे कुलपती प्रो. आर सी कुहाड यांनी आयएनएस वृत्तसंस्थेसोबत संवाद साधताना माहिती दिली. यावेळी बोलताना प्रो. कुहाड यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन आदी कारणांमुळे ठप्प झालेली शाळा, महाविद्यालयं त्यांच्या परीक्षा आणि शिक्षण हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुरु करता येऊ शकतात. त्यासाठी सध्यास्थितीत 25% शिक्षण हे ऑनलाईन करता येऊ शकते. व्हायवा, प्रॅक्टीकल्स, असाईन्मेंट्स अशा गोष्टी करताना तंत्रज्ञानाचा विशेष वापर करायला हवा. पण, हा वापर करणे तितके शक्य नाही, जितके आम्ही समजत आहोत. त्याला सध्यास्थितीत तितक्याच मर्यादाही आहेत. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस काळात परीक्षा, शैक्षणिक माहिती, शंका, तक्रारींसाठी 011-23236374 वर कॉल करा- विद्यापीठ अनुदान आयोग)
डिजिटल आणि ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याबाबतच्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे हे आजघडीला तरी घाई करण्यासारखे आहे. कारण परंपरागत चालत आलेल्या शिक्षण पद्धतीशी आम्ही जोडले गेलो आहोत. ती पद्धत डावलून सातत्याने डिजिटल अथवा ऑनलाईन प्रणालीपर्यंत पोहोचणे काहीसे घाईगडबडीचे ठरेन. पण आजच्या काळात ऑनलाईन शिक्षण ही वेळेची गरज आहे, यावरही युजीसी द्वारा गठित समितीत चर्चा झाल्याचे आणि तशी शिफारस करण्यात आल्याचे प्रो. कुहाड यांनी सांगितले.