LIC HFL Recruitment 2019: एलआयसी मध्ये Assistant Manager पदासाठी नोकरभरती सुरु; पहा महत्वाच्या तारखा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

या भरतीमधून निवडलेल्या उमेदवारांची 17 वेगवेगळ्या राज्यात नियुक्ती केली जाईल.

Representational Image (Photo Credits: File Photo)

एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (LIC Housing Finance Limited), सहाय्यक व्यवस्थापक (कायदेशीर) पदाच्या 35 जागांवरील नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमधून निवडलेल्या उमेदवारांची 17 वेगवेगळ्या राज्यात नियुक्ती केली जाईल. मात्र उमेदवार केवळ एकाच राज्यातून अर्ज करू शकतो. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे एलएलबी पदवी असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार एलआयसीच्या (HFL) अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. मात्र लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची मुदत 16 डिसेंबर ही आहे. अर्ज केल्यानंतर चार टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

महत्त्वाच्या तारखा -

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरुवात - 02 डिसेंबर 2019.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 16 डिसेंबर 2019

ऑनलाईन परीक्षेची तारीख (संभावित) - 27 जानेवारी 2020

आवश्यक पात्रता -

मान्यताप्राप्त विद्यापीठामधून 55 टक्के गुणांसह एलएलबी पदवी आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे

वय मर्यादा –

दिनांक 1 जानेवारी 2019 पर्यंत तुमचे किमान वय - 23 वर्षे, तर जास्तीत जास्त वय - 30 वर्षे असणे आवश्यक आहे.

अर्ज फी -

सहाय्यक व्यवस्थापक (कायदेशीर) - 500 रुपये (18% जीएसटी वेगळा द्यावा लागेल)

वेतनमान -

दरमहा 56,000 रुपयांपर्यंत वेतन मिळण्याची शक्यता. याव्यतिरिक्त विविध भत्ते (पोस्टिंगच्या जागेवर अवलंबून) असू शकतात.

निवड प्रक्रिया -

ऑनलाईन परीक्षा, मुलाखत, अंतिम निवड व वैद्यकीय परीक्षा अशा चार टप्प्यांमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडेल. ऑनलाईन परीक्षा देशातील 17 वेगवेगळ्या शहरांमध्ये घेण्यात येणार आहे.

अर्ज कसा करावा -

ऑनलाइन अर्जासाठी उमेदवाराला एलआयसी एचएफएलच्या अधिकृत वेबसाइट www.lichhouse.com च्या 'करिअर' विभागावर क्लिक करावे लागेल. पुढे ‘Job Opportunities' वर जावे लागेल आणि ‘रिक्रूटमेंट ऑफ असिस्टेंट मॅनेजर-लीगल' हे पृष्ठ उघडावे लागेल. इथे तुम्ही अर्जाची प्रक्रिया सुरु करू शकता. (हेही वाचा: खुशखबर! राज्यात डिसेंबरपासून तब्बल 72 हजार पदांची मेगाभरती; जाणून घ्या कोणत्या विभागात संधी)

आवश्यक कागदपत्रे -

अर्ज करताना, अर्जदाराकडे त्याचा पासपोर्ट साईझ फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि हाताने लिहिलेल्या निवेदनाच्या फॉर्मची एक सॉफ्ट कॉपी असणे आवश्यक आहे.

दरम्यान लक्षात घ्या, भरतीसंबंधित इतर सर्व महत्वाची माहिती मिळविण्यासाठी अर्जदारांनी एलआयसी एचएफएलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. तिथेच ते भरतीची थेट जाहिरात देखील पाहू शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने वेबसाइटवर दिलेली सर्व माहिती व मार्गदर्शक तत्त्वे वाचून मागच अर्ज करावा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif