Iris, केरळ मध्ये शाळेत आली पहिली एआय शिक्षिका (Watch Video)
AI Teacher नर्सरी ते इयत्ता 12वी पर्यंतचे विषय शिकवू शकते.
केरळ (Kerala) हे भारतामधील सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य आहे. आता केरळ मध्ये देशातील पहिली AI teacher लॉन्च करण्यात आली आहे. केरळ मधील या एआय टीचरचं नाव Iris आहे. Makerlabs Edutech Private Limited सोबत ही एआय टीचर बनवण्यात आली आहे. शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेला आणण्यात Iris महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवत आहे. Thiruvananthapuram च्या KTCT Higher Secondary School मध्ये या एआय टीचरला लॉन्च करण्यात आले आहे. ही एक ह्युमनॉइड आहे जी विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
तीन भाषा बोलण्याच्या आणि कठीण प्रश्नांना सामोरे जाण्याच्या क्षमतेसह, Iris प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिक लक्ष देऊन शिक्षण देऊ शकते. या एआय टीचरला व्हॉईस असिस्टंट आहे, इंटरअॅक्टिव्ह लर्निंग मॉड्युल्स आहेत सोबतच मॅन्युपलेशन क्षमता असल्याने वर्गात तिचं असणं विद्यार्थ्यांना फायद्याचं ठरणार आहे. नक्की वाचा: Saudi Robot 'Android Muhammad' Sexually Harasses Female News Reporter: सौदीच्या रोबोटचं महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन कॅमेर्यात कैद; व्हिडीओ वायरल (Watch Video) .
पहा AI teacher Iris
AI Teacher नर्सरी ते इयत्ता 12वी पर्यंतचे विषय शिकवू शकते. सध्या ती इंग्रजी, हिंदी आणि मल्याळम या तीन भाषा बोलते. सध्या डेव्हलपर 20 हून अधिक भाषांमध्ये याचा विस्तार करण्याची योजना आखत आहेत. पुढे, Iris मध्ये ड्रग्ज आणि हिंसा यासारख्या अयोग्य सामग्रीला ब्लॉक करण्याची क्षमता देखील आहे.