Job News Alert: भारतीय रेल्वे मध्ये 1.4 लाख पदांंवर मेगाभरती, 15 डिसेंबर पासुन होणार परिक्षा
त्या सर्व अर्जांची तपासणी करण्यात आली आहे. लवकरच पात्र उमेदवारांची परीक्षा 15 डिसेंबर 2020 पासून घेतली जाणार आहे.
भारतीय रेल्वेत (Indian Railway) विविध प्रकारच्या 3 श्रेणीत रिक्त पदांची भर्ती करण्याकरिता अर्ज मागविण्यात आले होते. त्या सर्व अर्जांची तपासणी करण्यात आली आहे. लवकरच पात्र उमेदवारांची परीक्षा 15 डिसेंबर 2020 पासून घेतली जाणार आहे.रेल्वेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही के. यादव यांनी याविषयी आज व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. भारतीय रेल्वेतर्फे 1 लाख 40 हजार 600 पदांसाठी विविध श्रेणींमध्ये भरतीसाठी कोरोना संकट उद्भवण्याच्या आधीच अर्ज मागवले होते, यानुसार राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरला 1.4 लाख रिक्त जागांसाठी 2.42 कोटी अर्ज प्राप्त झाले आहेत, या सर्व पदांंसाठी डिसेंबर मध्ये परिक्षा होणार आहेत, कोरोना परिस्थिती पाहता या परिक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार असल्याचे सुद्धा सांंगण्यात आले आहे.
सध्या परिक्षांंच्या तारखेबाबत घोषणा करताना लवकरच वेळापत्रक सुद्धा जारी करण्यात येईल असे यादव यांंनी सांंगितले आहे. या परिक्षांंच्या माध्यमातुन Non Technical Popular Categories, Isloated & Ministrial Categories आणि Level 1 (Track Maintainence) पदांंवर भरती होणार आहे.
मध्य रेल्वे ट्विट
दरम्यान, या परिक्षा अर्जांंची छाननी केव्हाच आटोपली होती मात्र कोरोनामुळे परिक्षा कशा घ्यायच्या हाच प्रश्न होता, मात्र केंद्र सरकारने जेईई, नीट परिक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यावर रेल्वेने सुद्धा संगणकीय मार्गाने परिक्षांंचे वेळापत्रक बनवायला घेतले आहे.