JEE, NEET Exam 2020: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविण्यासाठी जेईई, नीट परीक्षा आवश्यक- एनटीए

इथे दोन संगणकांमध्ये 1 मीटर अंतर असते. मात्र तरीही आम्ही ऑड इव्हन प्रणाली वापरत आहोत. त्यामुळे ही परीक्षा दोन प्रहरांमध्ये होईल. एक सकाळच्या प्रहरी आणि दुसरी दुपारच्या प्रहरी.

Examination | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) म्हणजेच एनटीए (NTA) जेईई (JEE Exam) आणि नीट ( NEET Exam) यांसारख्या परीक्षा घेण्यावर अजूनही ठाम आहे. एनटीएने म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष वाचविण्यासाठी जेईई, नीट यांसारख्या परीक्षा घेणे आवश्यक आहे. एनटीएने आपल्या भूमिकेवर ठाम राहात म्हटले आहे की, जर यंदाचे वर्ष कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे बाद असे ठरवले तर, आमची एक शैक्षणिक सत्र दोन वर्षांचे असते. मग दोन वर्षांचे सत्र आम्ही एका वर्षात कसे बसवायचे. आमचा पूर्ण प्रयत्न आहे की विद्यार्थ्यांचे वर्ष काही करुन वाचवायचेच. सर्वोच्च न्यायालयानेही जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या यासाठी दाखल याचिका फेटाळून लावली आहे.

विद्यमान शैक्षणिक वर्ष 2020-21 एका अर्थाने प्रतिकुल झाले आहे. कारण प्रवेश परीक्षेअभावी इंजीनियरींग आणि तत्सम अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, खासगी संस्था, विदेशी आणि आंतरराष्ट्रीय वद्यापीठं, जी या परीक्षांवर अवलंबून नाहीत त्यांनी अभासी वर्गांचा (ऑनलाईन शिक्षण) आधार घेत शैक्षणिक वर्ष सुरु केले आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना ही सोय उपलब्ध नाही त्यांना मात्र अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

एनटीएचे महानिदेशक विनीत जोशी यांनी म्हटले आहे की, जेईई परीक्षा संगणावर होते. इथे दोन संगणकांमध्ये 1 मीटर अंतर असते. मात्र तरीही आम्ही ऑड इव्हन प्रणाली वापरत आहोत. त्यामुळे ही परीक्षा दोन प्रहरांमध्ये होईल. एक सकाळच्या प्रहरी आणि दुसरी दुपारच्या प्रहरी. सकाळच्या प्रहरात परीक्षा देणारे विद्यार्थी ऑड संगणकावर आणि दुपारच्या प्रहरात परीक्षा देणारे विद्यार्थी ऑड संगणकावर परीक्षा देतील. (हेही वाचा, NEET Admit Card 2020 Released: नॅशनल टेस्टिंग एजंसी कडून नीट 2020 परीक्षा अ‍ॅडमीट कार्ड जारी; ntaneet.nic.in वरून करू शकाल डाऊनलोड)

जोशी यांनी पुढे बोलताना सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही विश्वस वाटत नाही त्यांना मी पूर्ण विश्वास देतो की, परीक्षा घेताना आम्ही पूर्ण सवाधगिरी बाळगू. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले जाईल. एका वर्गात 12 पेक्षा अधिक विद्यार्थीत असणार नाहीत याचीही काळजी घेतली जाणार आहे.त्यासाठी पक्षीक्षा केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. दरम्यान, एखाद्या मोठ्या केंद्राला अधिक मोठे करु शकत नाही, कारण विद्यार्थ्यांना गर्दी टाळण्यास प्रधान्य द्यायचे आहे, असेही जोशी म्हणाले.