ITBP Job Recruitment: दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या कशी असेल अर्ज प्रक्रीया

या भरती अंतर्गत हवालदार पदांवर भरती करण्यात येणार आहे.

Job | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

हल्ली मोठ्या प्रमाणावर तरुण नोकरीच्या (Job) शोधात आहेत. तसेच खासगी क्षेत्रात नोकरीसाठी (Private Jobs) मोठी स्पर्धा आहे शिवाय त्या नोकरीची लांब कालवधीची हमी देखील कमी असते. म्हणून सरकारी नोकरी (Government Jobs) मिळालेली सर्वोत्तम. पण सरकारी कार्यालयात (Government Office) नोकरीची संधी हवी असल्यास त्यासाठी पदव्युत्तर शिक्षण किंवा विशेष प्रवेश परिक्षा द्याव्या लागतात पण आता दहावी (SSC) पास विद्यार्थांना देखील सरकारी कार्यालयात नोकरीची संधी आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात (ITBP) दहावी पास उमेदवारांना नोकरीची (ITBP Constable Recruitment 2022) सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत हवालदार (Constable) पदांवर भरती करण्यात येणार आहे. तरी यासाठी नोंदणी प्रक्रीया, शैक्षणिक पात्रता, पगार किती असेल हे जाणून घेवूया.

 

इच्छुक उमेदवार https://recruitment.itbpolice.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 19 ऑगस्ट 2022 पासून सुरु झाली आहे.  या भरतीसाठीची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे. या भरतीसाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षा (Written Examination), पीईटी (PET) आणि पीएसटीद्वारे (PST) उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांना पुढील परीक्षेसाठी बोलावलं जाईल. संबंधीत भरतीसाठी अर्जदारांचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट असेल. (हे ही वाचा:- Job Recruitments In Maharashtra State Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत नोकरीची मोठी संधी; पदभरतीसाठी अर्ज प्रक्रीया सुरु, त्वरा करा)

 

इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात नोकरी मिळण्यास इच्छुक उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असणं आवश्यक आहे. तर या नोकर भरतीत हवालदार (Constable) पदांसाठी 108 जागांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये कॉन्स्टेबल (सुतार) 56 पदे, हवालदार (गवंडी) 31 पदे आणि हवालदार (प्लंबर) 21 पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना https://recruitment.itbpolice.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देवून नोकरीसाठी अर्ज करता येईल.