ISRO Recruitment 2021: 10 वी, 12 वी पास तसेच डिप्लोमा उमेदवारांसाठी इस्रोमध्ये नोकरभरती; जाणून घ्या कुठे कराल अर्ज, वयोमर्यादा व पात्रता
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने फायरमॅन ए, फार्मासिस्ट ए आणि लॅब टेक्नीशियन ए (ISRO Recruitment 2021) या पदांसाठी अर्ज मागविले आहेत
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने फायरमॅन ए, फार्मासिस्ट ए आणि लॅब टेक्नीशियन ए (ISRO Recruitment 2021) या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे असे इच्छुक आणि पात्र उमेदवार 05 एप्रिल 2021 च्या आधी इस्रोची अधिकृत वेबसाइट vssc.gov.in किंवा isro.gov.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. भरती प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना 34,900 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.
जाणून घ्या पदांची संख्या –
फार्मासिस्ट – 03 पदे
दहावी पास आणि फार्मसीमध्ये डिप्लोमा
वय मर्यादा - किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे.
फायरमॅन - 08 पदे
दहावी पास
पात्रता – पुरुष उमेदवाराची उंची 165 सेमी आणि महिला उमेदवाराची उंची 155 सेमी असावी.
पुरुष उमेदवाराची छाती 81 ते 86 सेमी असावी.
वय मर्यादा - किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे.
लॅब तंत्रज्ञ – 02 पदे
दहावी पास आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीची डिग्री असावी
वय मर्यादा - किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे.
तीनही पदांसाठी एससी, एसटीला वयोमर्यादामध्ये 5 वर्षे आणि ओबीसीला तीन वर्षांची सवलत मिळेल.
निवड-
फार्मासिस्ट व लॅब टेक्नीशियन पदासाठी लेखी परीक्षा व नंतर कौशल्य चाचणी घेतली जाईल. फायरमन पदासाठी शारिरीक कार्यक्षमता चाचणी व लेखी चाचणी घेण्यात येणार आहे.
यासाठी अर्ज फी 100 रुपये आहे. एससी, एसटी, माजी कामगार, दिव्यांग आणि महिलांसाठी अर्ज फी नाही. तर अशाप्रकारे इस्रोद्वारे सरकारी नोकरीच्या संधू उपलब्ध झाल्या आहेत.