IOCL Recruitment 2020: इंडियन ऑइल मध्ये 'या' पदासांसाठी नोकर भरती, उमेदवारांना 21 डिसेंबर पर्यंत करता येणार अर्ज
या अंतर्गत ज्युनिअर इंजिनिअर असिस्टंट, ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट, ज्युनिअर कंट्रोल अॅनालिस्ट पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
IOCL Recruitment 2020: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. या अंतर्गत ज्युनिअर इंजिनिअर असिस्टंट, ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट, ज्युनिअर कंट्रोल अॅनालिस्ट पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट आणि ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटच्या 3 पदासांठी निवड केली जाणार आहे. तर ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल अॅनालिस्ट 1 पद आणि ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी 1 पदासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.(BOI Recruitment 2020 for Officer Posts: बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; bankofindia.co.in वर करा 21 डिसेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज!)
वरील दिलेल्या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी iocl.com वर भेट द्यावी. तसेच या संकेतस्थळावर नोकर भरतीसाठीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा. परंतु उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर 2020 आहे. त्यानंतर कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही आहे.(BECIL Recruitment 2020: डेटा एन्ट्री ऑपरेटर, ऑफिस असिस्टेंटसह 749 पदांवर नोकर भरती, जाणून घ्या अधिक)
-IOCL Recruitment 2020 साठी या महत्वाच्या तारखा
>>ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात- 7 डिसेंबर, 2020
>>ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारखी- 21 डिसेंबर, 2020
>>लेखी परीक्षा- 3 जानेवार, 2021
>>लेखी परीक्षा निकाल- 8 जानेवारी 2021
-शैक्षणिक पात्रता
>>ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये 50 टक्के गुणांसह डिप्लोमा केलेला असावा. तर एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी 45 टक्के गुणे अनिवार्य असणार आहेत.
>>ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल अॅनालिस्टच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून फिजिक्स, केमिस्ट्रि, इंडस्ट्रिअल केमिस्ट्रि, मॅथेमॅटिक्स मध्ये बीएससी 50 टक्क्यांसह केलेली असावी. या व्यतिरिक्त अन्य पदासांठी शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.
ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट आणि ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदावारांना 25,000 ते 105,000 रुपये वेतन दिले जाणार आहे.