India's first AI teacher: केरळमधील शाळेने लॉन्च केली भारतातील पहिली एआय शिक्षक 'आयरिस' (Watch Video)
Iris (आयरिस) असे या महिला शिक्षकाचे नाव आहे. उल्लेखनीय असे की, Iris ही भारतातील पहिली एआय टीचर आहे.
येणारा काळ हा माहिती तंत्रज्ञानाचा असेल असे म्हटले जायचे. मानवाने आता एक पाऊल त्याच्याही पुढे टाकले आहे. आता कृत्रिम बुद्धीमत्ता विकसीत झाली आहे. अजूनही तिचा विकास होतो आहे नवनवे प्रयोग केले जात आहेत. त्याच्याच जोरावर आगामी काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) वापराचाच असेल हे जवळपास निश्चित झाले आहे. काळाची पावले ओळखून भारतातील केरळ हे राज्य नव्या तंत्रावर स्वार होऊ पाहते आहे. याचाच भाग म्हणून केरळ सरकारने आपला पहिला एआय निर्मिती महिला शिक्षक (India's first AI teacher) लॉन्च केला आहे. Iris (आयरिस) असे या महिला शिक्षकाचे नाव आहे. उल्लेखनीय असे की, Iris ही भारतातील पहिली एआय टीचर आहे.
एआय टीचर व्हिडिओ
केरळ सरकारने Makerlabs Edutech Private Limited च्या सहकार्याने महत्त्वाचे पाऊल टाकत ही निर्मिती केली आहे. या नव्या शिक्षिकेचे तिरुअनंतपुरममधील KTCT उच्च माध्यमिक विद्यालयात अनावरण केले गेले. आयरिस ही एक ह्युमनॉइड आहे. जी विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाइन केलेली आहे. हे मॉडेल तयार करणाऱ्या कंपीने या शिक्षिकेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये शिक्षणात परिवर्तन करण्याची क्षमता दर्शविली आहे. आपल्या अनोख्या प्रयोगाबद्दल बोलताना कंपनीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, "IRIS सह, आम्ही खरोखर वैयक्तिकृत शिकण्याचा अनुभव तयार करण्यासाठी AI च्या सामर्थ्याचा उपयोग करून शिक्षणात क्रांती घडवून आणण्यासाठी निघालो आहोत."
एका टीचरची वैशिष्ट्ये
NITI आयोगाने सुरू केलेल्या अटल टिंकरिंग लॅब (ATL) प्रकल्पांतर्गत तयार केलेले, पारंपारिक शिक्षण पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने आयरिस अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. व्हिडिओ आयरिसच्या परस्परसंवादी क्षमता आणि बहुमुखी शिक्षण साधन म्हणून त्याची भूमिका निभावतो. याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, हे मॉडेल एकाच वेळी तीन भाषा बोलू शकते. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तीकरित्या वेगवेगळा शैक्षणिक अनुभव सामायिक करते. त्यामुळे विद्यार्थ्याचा कल आणि मानसिक स्थिती पाहूनही त्याला शिकवणे सोपे जाणार असल्याचे म्हटले आहे.
व्हिडिओ
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजे यंत्राद्वारे, विशेषतः संगणक प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमत्ता प्रक्रियांचे अनुकरण. यात तंत्रज्ञान आणि तंत्रांची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे, जी मशीन्सना कार्ये करण्यास सक्षम करते. ज्यांना सामान्यत: मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असते, जसे की शिकणे, समस्या सोडवणे, निर्णय घेणे आणि भाषा समजणे. एआय सिस्टम पॅटर्नचे विश्लेषण करण्यासाठी, अंदाज लावण्यासाठी आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी अल्गोरिदम आणि डेटावर अवलंबून असतात.