Indian Railway Recruitment 2021: परीक्षाशिवाय भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 8 वी, 10 वी उत्तीर्णही करू शकतात अप्लाय, जाणून घ्या पदांची नावे व कुठे कराल अर्ज

लोक त्यासाठी खूप प्रयत्न करतात परंतु परीक्षेला बसल्यानंतर काही मोजकेच लोक त्यात उत्तीर्ण होऊ शकतात. जर तुम्ही देखील रेल्वेमध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहत असाल तर यावेळी रेल्वे विभागाने परीक्षा न देता नोकरीची प्रक्रिया सुरू केली आहे

Representational Image | (Photo Credits: PTI)

देशातील अनेक लोकांचे भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railway) काम करण्याचे स्वप्न असते. लोक त्यासाठी खूप प्रयत्न करतात परंतु परीक्षेला बसल्यानंतर काही मोजकेच लोक त्यात उत्तीर्ण होऊ शकतात. जर तुम्ही देखील रेल्वेमध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहत असाल तर यावेळी रेल्वे विभागाने परीक्षा न देता नोकरीची प्रक्रिया सुरू केली आहे. होय, उत्तर मध्य रेल्वे प्रयागराज, उत्तर प्रदेश (North Central Railway Prayagraj) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात ते rrcpryj.org वर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 2 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना https://rrcpryj.org/Apprentice.php या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट ऑनलाइन अर्ज करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. यासह, जर तुम्हाला भारतीय रेल्वेने जारी केलेल्या अप्रेंटिस भर्तींच्या अधिसूचनेबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर https://rrcpryj.org/Downloads/Notification-Act-Apprentice-English.pdf वर क्लिक करून याबाबतची अधिसूचना पाहू शकता. रेल्वेच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत प्रशिक्षणार्थींच्या एकूण 1664 पदांची भरती करण्यात येणार आहे. (हेही वाचा: Fake Universities in India: देशातील बोगस विद्यापीठांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर, उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर, महाराष्ट्रातील एकाचा समावेश)

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख  01 सप्टेंबर 2021 आहे. भारतीय रेल्वे प्रयागराज, उत्तर प्रदेश अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती होत आहे. या पदांवर रिक्त पदांची संख्या 1664 आहे, ज्या अंतर्गत ही रिक्त पदे 5 ठिकाणी भरली जातील.

अशी आहेत पदे-

प्रयागराज यांत्रिक विभाग - 364

प्रयागराज विद्युत विभाग - 339

झाशी विभाग - 480

वर्क शॉप झांसी-185

आग्रा विभाग – 296

पात्रता -