ICSI CSEET 2021 Admit Card Released:कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्टरन्स टेस्ट साठी अॅडमीट कार्ड जारी, icsi.edu वरून असं करा डाऊनलोड
यंदा देशातील कोरोना परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना त्यांचे लॅपटॉप , डेस्कटॉप वापरून परीक्षा घरूनच देता येणार आहे.
The Institute of Company Secretaries of India कडून Company Secretary Executive Entrance Test अर्थात CSEET July 2021 परीक्षेचं अॅडमिट कार्ड प्रसिद्ध करण्यात आले आहे. यंदा या परीक्षेसाठी रजिस्टर केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेब साईट icsi.edu द्वारा त्याचे अॅडमीट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. यावर्षी ICSI CSEET exam शनिवार, 10 जुलै दिवशी पार पडणार आहे. ही ऑनलाईन remote-proctored mode मध्ये होणार आहे.
यंदा देशातील कोरोना परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना त्यांचे लॅपटॉप , डेस्कटॉप वापरून परीक्षा घरूनच देता येणार आहे. मात्र यामध्ये स्मार्टफोन, टॅब्स वापरता येणार नाही. इन्स्टिट्युट कडू यंदा CSEET July session मधून Viva Voce portion काढून टाकण्यात आली आहे.
CSEET July 2021 Admit Card कसं डाऊनलोड कराल?
- icsi.edu या अधिकृत संकेतस्थळाला भेट्ट द्या.
- ‘CSEET’या सेक्शनला भेट द्या. नंतर admit card download link वर क्लिक करा.
- त्यानंतर CSEET registration number आणि जन्म तारीख टाकून लॉगिन करा.
- तुमचं अॅडमिट कार्ड स्क्रिनवर दिसेल.
- हे अॅडमिट कार्ड कॉपीच्या स्वरूपात सेव्ह करून ठेवा.
नक्की वाचा: CA Exams 2021: जुलै मध्ये होणाऱ्या सीए परीक्षेसाठी Opt-Out Scheme जारी करण्याचे सुप्रीम कोर्टाचे ICAI ला आदेश.
ICSI CSEET July 2021 च्या परीक्षेमध्ये यंदा MCQ pattern ने प्रश्न विचारले जाणार आहे. 120 मिनिटांसाठी 200 मार्कांच्या 4 प्रश्नावल्या उमेदवारांना सोडवायच्या आहेत. दरम्यान उमेदवारांना अॅडमीट कार्ड वर दिलेल्या सूचना देखील नीट वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Executive Programme of Company Secretary Course च्या रजिस्ट्रेशन साठी ही CSEET परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचे आहे.