ICSI CS December 2021 Professional Exams Result Released: सीएस प्रोफेशनल परीक्षेचा निकाल जाहीर; इथे पहा मार्क्स

तर दुपारी 2 वाजता एक्झिक्यूटिव्ह परिक्षेचा निकाल जारी केला जाणार आहे.

Representative Image ( Photo Credits: Pixabay )

ICSI कडून घेण्यात आलेल्या CS December 2021 Professional Examsचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे मार्क्स ऑनलाईन पाहता येणार आहेत. आज सकाळी 11 वाजता हा निकाल वेबसाईटवर जारी करण्यात आला आहे. तर दुपारी 2 वाजता एक्झिक्यूटिव्ह परिक्षेचा निकाल जारी केला जाणार आहे.  उमेदवरांना त्यांचा निकाल ICSI ची अधिकृत वेबसाईट icsi.edu  वर पाहता येणार आहे. यंदाच्या निकालामध्ये देशात  Shruti Nagar टॉपर आहे त्यापाठोपाठ Hari Haran आणि तिसर्‍या स्थानी  Jyoti Ashok Kumar Sah आहे.

विद्यार्थ्यांना एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम मधून पास होण्यासाठी या परीक्षेत होणार्‍या चारही परीक्षांच्या पेपर मध्ये किमान 40% मार्क्स आवश्यक आहेत तर सारे मिळून 50% मार्क्स आवश्यक आहेत.  कोविड च्या पार्श्वभूमीवर हा निकाल विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन स्वरूपात पाहता येणार आहे. आयसीएसआय कडून ऑफलाईन किंवा हार्ड कॉपीच्या स्वरूपात त्यांचा निकाल किंवा मार्क्सची निकालाची प्रत दिली जाणार नाही. नक्की  वाचा: CS December Result 2021: Professional आणि Executive परीक्षांचा निकाल 25 फेब्रुवारीला होणार जाहीर; icsi.edu वर पहा 'असे' मार्क्स.

कसा पाहाल निकाल?

इथे पहा निकालाची अ‍ॅक्टिव्ह लिंक  

भारतामध्ये  The Institute of Company Secretaries of India (ICSI)ची स्थापना 1968 साली करण्यात आली आहे. ही भारतातील अधिकृत संस्था आहे जी देशातील कंपनी सचिवांच्या व्यवसायाची बढती, नियमन आणि विकास पाहते.