ICSE, ISC Term I Exam 2021: CISCE ची 10वी,12वी च्या विद्यार्थ्यांसाठी नियमावली जारी; 22 नोव्हेंबर पासून परीक्षांना सुरूवात

ISC Semester I परीक्षा 22 नोव्हेंबरला सुरू होणार आहे तर 20 डिसेंबरला संपणार आहे

Students | Representational Image | (Photo Credits: PTI)

काऊंसिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (Council for the Indian School Certificate Examination) अर्थात CISCE कडून यंदा 10वी,12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर काही नियमावली जारी करण्यात आली आहे. ICSE, ISC Term I Exam 2021 च्या विद्यार्थ्यांना यंदा दोन टर्म मध्ये बोर्डाची परीक्षा द्यायची आहे. त्याच्या अनुषंगाने विद्यार्थी, पालकांचा गोंधळ टाळण्यासाठी बोर्डाने CISCE ची अधिकृत वेबसाईट cisce.org वर नियमावली जारी केली आहे.

ICSE Semester I परीक्षा यंदा 29 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे तर 16 डिसेंबर 2021 दिवशी संपणार आहे. ISC Semester I परीक्षा 22 नोव्हेंबरला सुरू होणार आहे तर 20 डिसेंबरला संपणार आहे. या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी बोर्डाची नियमावली खालीलप्रमाणे आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इथे पहा नोटीस .

ICSE, ISC Term I Exam 2021 साठी नियमावली

मागील शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना कोविड 19 संकटामुळे परीक्षा न घेताच केवळ अंतर्गत मूल्यमापन करून गुण देऊन अंतिम निकाल देण्यात आला होता. मात्र यंदा सीबीएससी प्रमाणे आयसीएसई बोर्डानेही विद्यार्थ्यांना दोन सेमिस्टर मध्ये बोर्डाची परिक्षा ठेवली आहे.