ICSE, ISC 2019 Results: CISCE बोर्डाने जाहीर केला निकाल, मुंबईकर जूही कजारिया 10 वी परीक्षेत देशात पहिली, 12 वी मध्ये देवांग कुमार अग्रवाल आणि विभा स्वामीनाथन 100% गुणांसह अव्वल

98.54% विद्यार्थी बारावीच्या विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे.

Results 2019

ICSE, ISC 2019 Merit List and Toppers: आज CISCE ने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला आहे. देवांग कुमार अग्रवाल आणि विभा स्वामीनाथन यांनी 100% गुण मिळवत अव्वल स्थान पटाकवले आहे. cisce.org वर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. www.cisce.org आणि  www.results.cisce.org सोबतच examresults.net आणि  indiaresults.com या वेबसाईटवरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.ICSE, ISE Results 2019: आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल cisco.org वर जाहीर

ICSE Result 2019 Toppers

मुंबईची जुही कजारिया आणि मुक्तसारच्या मनहर बंसल याने दहावीच्या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्यांना 99.60% मार्क्स मिळाले आहेत. यश भंसाली, फोरम संजनवाला  दुसर्‍या स्थानी आहेत. Board Exam Results 2019: महाराष्ट्रामध्ये SSC, HSC, CBSE, ISCE बोर्डाच्या 10-12 वीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?

ISE Result 2019 Toppers

देवांग कुमार अग्रवाल आणि विभा स्वामीनाथन यांनी 100% गुण मिळवत अव्वल स्थान पटाकवले आहे. हे बारावीचे विद्यार्थी आहेत.

विभागनिहाय आयसीएसई दहावी, बारावीचा निकाल

Western region: 99.76%

Southern region: 99.73%

Eastern region: 98.06 %

Northern region: 97.87%

Abroad region: 100%

CISCE बोर्डाच्या निकालामध्येही मुलींनी बाजी मारली आहे. 98.54% विद्यार्थी बारावीच्या विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. दहावीचा निकाल 98.54%, तर बारावीचा निकाल  96.52%  लागला आहे.