ICAI CA Inter & Final Result 2024: आज जाहीर होणार सीए परीक्षेचा अंतिम निकाल; icai.org वर पहा मार्क्स

Result 2024 | file image

Institute of Chartered Accountants of India कडून आज Chartered Accountants Final आणि Intermediate examination चा यंदाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. आज 11 जुलै दिवशी अधिकृत वेबसाईट icai.org वर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर देणं आवश्यक आहे.

ICAI CA Inter exam ग्रुप 1 साठी मे महिन्यात 3 ते 9 दरम्यान झाली होती तर ग्रुप 2 ची परीक्षा 11 मे, 15 मे आणि 17 मे दिवशी झाली होती. दरम्यान सीए फायनल ग्रूप 1 ची परीक्षा मे महिन्यात 2,4,8 दिवशी झाली होती आणि ग्रुप 2 ची परीक्षा 10,14,16 मे दिवशी झाली होती. International Taxation -Assessment Test यंदा 14 आणि 16 मे दिवशी घेण्यात आली होती.

Chartered Accountants Final आणि Intermediate Examination चा निकाल कसा पहाल?

ICAI CA inter exam मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40% गुण प्रत्येक पेपर मध्ये मिळवणं आवश्यक आहे. तर प्रत्येक ग्रुप मध्ये एकूण 50% गुण मिळवणं आवश्यक आहे. ICAI ने CA अभ्यासक्रमासाठी नवीन शिक्षण आणि प्रशिक्षण जाहीर केले. CA फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल नवीन स्कीम 2023 1 जुलै 2023 रोजी लागू झाली. नवीन स्कीम अंतर्गत CA इंटरमीडिएट आणि फायनलचे पहिले सत्र मे 2024 मध्ये आयोजित करण्यात आले होते.