ICAI CA Exam 2020: चार्टर्ड अकाउंट्स फाउंडेशन परीक्षा पेपर-1 येत्या 8 डिसेंबर ऐवजी 13 तारखेला होणार, icai.org येथे पहा संपूर्ण वेळापत्रक

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

ICAI CA Exam 2020:  इंस्ट्यिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटस ऑफ इंडिया (ICAI) यांनी सीए परीक्षेसाठी (CA Exam 2020) अॅडमिट कार्ड जाहीर केले होते. तर आता येत्या 8 डिसेंबरला चार्डेड आकआउंट्स फाउंडेशन परीक्षा पेपर-1 (Chartered Accountants Foundation Examination paper-1) पार पडणार होता. मात्र तो पेपर आता येत्या 13 तारखेला घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर काही अपरिहार्य परिस्थितीमुळे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी घेतला आहे.

ICAI यांनी एक पत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, काही अपरिहार्य परिस्थितीमुळे चार्टर्ड अकाउंट्स फाउंडेशन एक्झामिनेशन, पेपर-1, प्रिन्सिपल अॅन्ड प्रॅक्टिस ऑफ अकाउंट्स हा 8 डिसेंबरला दुपारी 2 ते 5 या वेळात पार पडणार होता. पण तो आता रिशेड्युल करण्यात आला आहे. त्यामुळे पेपर आता 13 डिसेंबरला त्याच वेळेत घेण्यात येणार असल्याचे पत्रकात स्पष्ट केले आहे.(ICAI CA 2020 Exam Admit Cards Released: विद्यार्थ्यांना बेकरी, प्राथमिक शाळा, कोविड19 केअर सुविधेच्या ठिकाणी केंद्र मिळाल्याच्या तक्रारी)

Tweet:

तर विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी www.icai.org या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन ही करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे आयसीएआयची परीक्षा मे महिन्यात स्थगित करुन पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट मध्ये ही होणार होती. मात्र अखेर नोव्हेंबर 2020 मध्ये पार पडणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना परीक्षेचे अॅडमिट कार्ड आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपासता येणार आहे. आयसीएसच्या अॅडमिट कार्डच्या येथे विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे केंद्र आणि वैयक्तिक माहिती सुद्धा दिसून येणार आहे.