HPCL Recruitment 2023: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये नोकरीची संधी, पगार 7,52,000 रुपये, पण पात्रता आणि अटी काय? घ्या जाणून
एचपीसीएल जवळपास 60 रिक्त भरत आहे. त्यासाठी एचपीसीएलने भर्ती (HPCL Recruitment 2023) काढली आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( Hindustan Petroleum Corporation Limited) म्हणजेच एचपीसीएल (HPCL) या बहुचर्चित आणि नामांकीत कंपनीत नोकरीची संधी निर्माण झाली आहे. एचपीसीएल जवळपास 60 रिक्त भरत आहे. त्यासाठी एचपीसीएलने भर्ती (HPCL Recruitment 2023) काढली आहे. आपणही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर पदे, पात्रता आणि इतर तपशील घ्या जाणून. जगभरात निर्माण झालेली मंदीची लाट आणि आंतरराष्ट्रीय खासगी कंपन्यांकडून होत असलेली कर्मचारी कपात पाहता सरकारी नोकरीसाठी जाहीरात निघणे हे अनेक तरुणांसाठी दिलासादायक मानले जात आहे.
कोणकोणत्या पदांसाठी भर्ती
- असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन (Assistant Process Technician)
- असिस्टंट बॉयलर टेक्निशियन ( Assistant Boiler Technician),
- असिस्टंट फायर अँड सेफ्टी ऑपरेटर (Assistant Fire & Safety Operator)
- असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (Assistant Maintenance Technician (Electrical))
वरील सर्व जागा आणि त्यासंबंधीत अचूक माहितीसाठी एचपीसीएलच्या या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण जागा, वेतन आणि वयोमर्यादा
HPCL नेकाढलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 60 जागांसाठी ही भर्ती होणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना ऋजू होताच वार्षिक वेतन CTC नुसार 752000 रुपये इतके असेल. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान वय 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे आहे. (हेही वाचा, Government Jobs 2023: राज्य सेवेत 75 हजार जागा रिक्त, 15 ऑगस्टपूर्वी नोकरभरती पूर्ण करण्यासाठी सरकार स्थापणार समिती, जाणून घ्या विभागनिहाय जागा)
HPCL बद्दल थोडक्यात माहिती
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ही 15 जुलै 1974 रोजी स्थापन झालेली आणि सध्यास्थितीत उर्जा क्षेत्रात काम करणारी एक जागतिक कंपनी आहे. भारत सरकारची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. जी तेल उद्पादन आणि वितरण करण्याचे काम करते. भारत सरकारकडून या कंपनीला महारत्न हा दर्जा मिळाला आहे.