Government Job: महिला बाल विकास विभागात नोकरीची संधी, आजचं अर्ज करा
या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
देशात दिवसेनदिवस बेरोजगारांच्या (Unemployment) संख्येत वाढ होत आहे. पदवीधर (Graduation) शिक्षण घेवून देखील अनेक तरुण तरुणी नोकरीच्या (Job) शोधात आहेत. हल्ली सगळ्याचं क्षेत्रात नोकरीसाठी मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे.तरी नोकरीसाठी अर्ज (Application For Job) करणाऱ्यांची संख्या ही रिक्त जागांपेक्षा अधिक असल्याचं दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी परिक्षा देताना दिसतात पण त्यातही निवड होणाऱ्यांची संख्या अगदी तुरळक. तरी महिला व बाल विकास विभागात सहाय्यक (Assistant) आणि बहुउद्देशीय कर्मचारी पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन (Online) माध्यमातून अर्ज दाखल करता येणार आहेत.
संबंधित पदभरती बाबत www.gondia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. तरी 1 सप्टेंबर 2022 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. महिला व बाल विकास विभागात सहाय्यक पदांची भरतीसाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये (Age Limit) सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. नोटिफिकेशनमध्ये (Notification) संबंधित सविस्तर तपशील देण्यात आला आहे. तसेच संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे उमेदवारांना आवश्यक आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवार पदवीधर (Graduation) असणे आवश्यक आहे. सोबतच संगणकाचे ज्ञान (Computer Education), इंग्लिश टायपिंग (English Typing), मराठी टायपिंग (Marathi Typing) या बाबी अनिवार्य आहे. या पदासाठी एकूण 16 जागांवर भरती केल्या जाणार आहे. तरी वय वर्ष 25 वर्षे ते 45 वर्षापर्यंतचे उमेदवार या पदासाठी अर्ज दाखल करु शकतात. (हे ही वाचा:- ITBP Job Recruitment: दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या कशी असेल अर्ज प्रक्रीया)
महिला व बाल विकास विभागात बहुउद्देशीय कर्मचारी या पदावर देखील पदभरती केली जाणार आहे. नोकरीचे ठिकाण गोंदिया (Gondia) असणार आहे. सहाय्यक पदाप्रमाणेचं उमेदवार पदवीधर असणे, संगणकाचे ज्ञान, इंग्लिश टायपिंग , मराठी टायपिंग आवश्यक आहे. . तरी वय वर्ष 25 वर्षे ते 45 वर्षापर्यंतचे उमेदवार या पदासाठी अर्ज दाखल करु शकतात. या पदासाठी एकूण 8 जागांवर भरती केल्या जाणार आहे. संबंधित पदभरती बाबत www.gondia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदाभरतीची शेवटची तारीख देखील 1 सप्टेंबर 1011 आहे.