Government Job: आता सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी पास करण्याची गरज नाही, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा

अजून तरी याबाबतचा कुठलाही निर्णय सरकारने घेतला नसला तरी लवकरचं याबाबत राज्य सरकार विचार करेल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

Job ( Photo Credit - File Image)

हल्ली सरकारी नोकरी मिळण कठीण झालं आहे. उमेदवार सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी धडपड करताना दिसतात. पदवी, पद्युत्तर शिक्षण घेवून स्पर्धा परिक्षांची तयारी करतात. आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा कालावधी,वेळ, पैश्याची गुंतवणुक करुन परिक्षेची तयारी करतात. पण सगळ्यांनाचं या परिक्षेत यश मिळतं असं नाही. अनेक विद्यार्थी मेहनतीने वर्षानुवर्षे अभ्यास करुन देखील या परिक्षेत यशस्वी होत नाहीत. तर काही उमेदवार प्री परिक्षा पास करतात तर मेन्स परिक्षा पास होत नाहीत काही विद्यार्थी मेन्स पास होतात तर मुलाखतीत यशस्वी होत नाही. अशा वेळी अनेक उमेदवार नाराज होतात. जागा कमी आणि उमेदवार जास्त असल्याने अवघ्या बोटावर मोजता येईल एवढ्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळते. पण आता एमपीएससी ही स्पर्धा परिक्षा देण्याची गरज नाही.

 

एमपीएससी या परिक्षेविना उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार असल्याची माहिती तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. अजून तरी याबाबतचा कुठलाही निर्णय सरकारने घेतला नसला तरी लवकरचं याबाबत राज्य सरकार विचार करेल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पण विनास्पर्धा परिक्षा राज्य सरकारकडून देण्यात येणार असलेले हे  जॉब कायस्वरुपी नसून हे या कंत्राटी स्वरूपाच्या नोकऱ्या असणार आहेत. (हे ही वाचा:- Govt Jobs for 12th Pass 2023: 12वी पास उमेदवारांसाठी 4500 पदांची भरती; अर्ज करण्याची पद्धत आणि अधिसूचनाविषयी अधिक जाणून घ्या)

 

दरवर्षी राज्य सरकारकडून हजारो कंत्राट नोकरदार भरले जातात. या कंत्राटी उमेदवारांना मजबूत पगार आणि सरकारी काम दिल्या जात. पण तरीही हव्या त्या दर्जाचं काम होत नसल्याने राज्य सरकारचं मोठं नुकसान होते. यांवर उपाय म्हणुनचं राज्य सरकार या कंत्राटी उमेदवारांच्या ठिकाणी राज्यसेवा परिक्षेची तयारी करीत असलेल्या उमेदवरांना कंत्राटी स्तरावर नोकरी घेण्याचा विचार करीत आहेत. तरी याबाबत ठोस असा अजून तरी कुठलाही निर्णय झालेला नाही पण उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत अंतीम निर्णय घेतील असे सांगितले आहे.