Goa Board 10th Result 2021: गोवा बोर्डाचा 10 वीचा निकाल जाहीर; विद्यार्थी gbshse.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकतात
विद्यार्थी gbshse.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू आणि डाउनलोड करू शकतात.
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (GBSHSE) आज, 12 जुलै रोजी इयत्ता 10 च्या बोर्डाचा निकाल (Class 10 Result) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला. विद्यार्थी gbshse.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू आणि डाउनलोड करू शकतात. यंदा कोरोना व्हायरसमुळे मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. गोवा एज्युकेशन बोर्डाने शैक्षणिक वर्षात शाळांकडून घेतलेल्या अंतर्गत मूल्यांकन आणि बोर्डाने विकसित केलेल्या निकषांच्या आधारे, विद्यार्थ्यांचा निकाल निश्चित करण्याची योजना तयार केली आहे.
विद्यार्थी अशाप्रकारे त्यांचा निकाल पाहू शकतात -
- बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच gbshse.gov.in ला भेट द्या.
- होमपेजवर 'GOA SSC Examination Results 2021' या दुव्यावर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
- याठिकाणी आपले नाव आणि रोल नंबर टाइप करा आणि ‘सबमिट करा’ वर क्लिक करा.
- आता आपला दहावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- तो डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मते, यावेळी दहावीतील 99.27% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 23,967 विद्यार्थ्यांपैकी 23,900 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. केवळ 67 विद्यार्थी नापास झाले आहेत. मूल्यमापन निकष व अंतर्गत परीक्षेच्या गुणांवरून मंडळाने हा निकाल दिला आहे. (हेही वाचा: IBPS Clerk 2021: सरकारी बँकेत क्लर्क पदासाठी नोकर भरती, आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु)
निकाल जाहीर झाल्यानंतर गोवा बोर्डाच्या संकेतस्थळावर जास्त ट्राफिकमुळे निकाल तपासण्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत, आपल्याला गोवा बोर्डाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून रिझल्टबाबत अपडेट्स मिळू शकतात किंवा आपण आपण एसएमएसद्वारेही निकाल तपासू शकता.