CUET UG 2022 Phase 6 Exam Admit Card जारी; अधिकृत वेबसाईट cuet.samarth.ac.in वरून असं करा डाऊनलोड

या परीक्षेला यंदा एकूण 1.91 लाख विद्यार्थी सामोरे जाणार आहेत.

Exam | Representational Image (Photo credits: Pixabay)

द नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीए कडून आता CUET UG Admit Card for Phase 6 देखील जारी करण्यात आली आहेत. CUET UG परीक्षेचा हा सहावा आणि अंतिम टप्पा आहे. विद्यार्थ्यांना त्यांची हॉलतिकीट्स cuet.samarth.ac.in  वर उपलब्ध आहेत. सहाव्या टप्प्यातील ही परीक्षा 24, 25, 26 आणि 30 ऑगस्ट दिवशी घेतली जाणार आहे. या परीक्षेला यंदा एकूण 1.91 लाख विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. NTA च्या माहितीनुसार, दुसर्‍या टप्प्यात होणारी CUET UG Exam जी 4,5,6 ऑगस्टला झालेल्या परीक्षेत जे तांत्रिक त्रृटीमुळे किंवा परीक्षा केंद्र रद्द झाल्यामुळे सहभागी होऊ शकले नाहीत त्यांना आता फेझ 6 मध्ये सहभागी होता येईल. 28 ऑगस्टला सार्‍या टप्प्यांतील परीक्षा पूर्ण करण्याचा एनटीए चा मानस होता पण आता तो 30 ऑगस्ट पर्यंत लांबवण्यात आला आहे. CUET-UG Phase 4 Exam आता 30 ऑगस्टला; NTA ने जारी केलं नवं नोटिफिकेशन .

कसं डाऊनलोड कराल हॉल तिकीट?

CUET UG परीक्षा 489 परीक्षा केंद्रांवर होणार आहे. त्यासाठी भारतातील 289 शहरांत परीक्षा केंद्रं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भारताबाहेरही 9 शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये शारजाह, दोहा, दुबई, काठमांडू, मस्कद, रियाद या शहरांचा समावेश आहे.