CUET PG Admit Card: सीयूईटी पीजी परीक्षेसाठी अॅडमीड कार्ड्स pgcuet.samarth.ac.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
संपूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेरील 24 शहरांमध्ये 157 विषयांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाईल.
नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) कडून Common University Entrance Test Postgraduate (CUET PG 2024) साठी अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. 17 मार्च दिवशी ही परीक्षा होणार आहे. परीक्षार्थी त्यांची अॅडमिट कार्ड्स अधिकृत वेबसाईट pgcuet.samarth.ac.in वरून डाऊनलोड करू शकतात. यासाठी परीक्षार्थ्यांना अॅप्लिकेशन फॉर्म नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागणार आहे. केंद्रीय आणि राज्य विद्यापीठांमध्ये आणि इतर संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणं बंधनकारक आहे. CUET PG प्रवेश परीक्षा तीन शिफ्टमध्ये घेतली जाईल - सकाळी 9 ते 10:45, दुपारी 12:45 ते 2:30 आणि दुपारी 4:30 ते 6:15 या वेळेत ही परीक्षा होणार आहे.
यंदा postgraduate programmes मध्ये प्रवेश घेण्यासाठी यंदा 189 विद्यापीठांनी CUET PG मध्ये सहभाग नोंदवला आहे. संपूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेरील 24 शहरांमध्ये 157 विषयांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाईल. Free Education for Girls in Maharashtra: मुलींना मोफत शिक्षण; मेडिकल, इंजिनिअरिंग 600 अभ्यासक्रमांना घेता येणार प्रवेश .
कसं कराल अॅडमीट कार्ड डाऊनलोड?
- pgcuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- आता अॅडमीट कार्डची डाऊनलोड ची टॅब ओपन करा.
- तुमचा अॅप्लिकेशन नंबर टाका, जन्मतारीख टाका आणि लॉग ईन करा.
- आता तुमचं अॅडमीट कार्ड डाऊनलोड करू शकाल.
- तुमच्या अॅडमीट कार्डची प्रिंट आऊट काढू शकता.
अॅडमीट कार्डबद्दल काही गडबड असल्यास तुम्ही cuetpg@nta.ac.in वर एनटीए ला मेल करू शकाल किंवा 011-40759000 या नंबर वर मदत मागू शकाल.