CBSE Term 2 Exam 2022: सीबीएसई बोर्डाने 26 एप्रिल पासून सुरू होणार्‍या परीक्षेसाठी जारी केली नियमावली; लवकरच Admit Card होणार प्रसिद्ध

यंदा कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षा दोन टर्म मध्ये होत आहेत.

CBSE | (Photo Credit: ANI)

सीबीएससी बोर्डाच्या टर्म 2 (CBSE Term 2 Exam 2022) च्या 10वी, 12वी च्या परीक्षा 26 एप्रिल पासून सुरू होणार आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणामध्ये आणि तणावमुक्तपणे परीक्षा देता यावी याकरिता बोर्डाने परीक्षेआधी खास नियमावली जारी केली आहे. यंदा 10वी, 12वीच्या एकूण सीबीएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्या 34 लाखांच्या आसपास आहे. यंदा कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षा दोन टर्म मध्ये होत आहेत. पहिल्या टर्मची परीक्षा डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान घेण्यात आली. आता टर्म 2 परीक्षा 26 एप्रिल ते 15 जून दरम्यान पार पडणार आहे.

सीबीएससी बोर्डाने या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर खास नियमावली जारी केली आहे. तर परीक्षेचं अ‍ॅडमीड कार्ड लवकरच जारी केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना ते अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर पहता येणार आहे. हे देखील नक्की वाचा: CBSE Term 1, Term 2 Weightage बाबत सोशल मीडीयात वायरल होतय फेक परिपत्रक; बोर्डाने केला खुलासा .

CBSE Term 2 Board Exams 2022 साठी काय असेल नियमावली?