CBSE Term 2 Admit Cards 2022: 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीटं जारी; cbse.gov.in वरून अशी करा डाऊनलोड!

12वीचा शेवटचा पेपर 15 जून 2022 दिवशी आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

सीबीएसई बोर्डाकडून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी CBSE term 2 Admit Cards 2022 जारी करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना आपली हॉल तिकीट्स सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वरून डाऊनलोड करता येणार आहे. यंदा सीबीएसई बोर्डाची 10वी, 12वीची परीक्षा टर्म 2 करिता 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहे तर 10वीची 24 मे 2022 दिवशी ही परीक्षा संपेल. 12वीचा शेवटचा पेपर 15 जून 2022 दिवशीचा आहे. देशभरात विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी अ‍ॅडमीट कार्ड हे एक बंधनकारक कागदपत्र आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट वरून अ‍ॅडमीड कार्ड डाऊनलोड करावं लागणार आहे. हे देखील नक्की वाचा: CBSE Term 2 Exam 2022: सीबीएसई बोर्डाने 26 एप्रिल पासून सुरू होणार्‍या परीक्षेसाठी जारी केली नियमावली; लवकरच Admit Card होणार प्रसिद्ध.

CBSE term 2 admit card कशी कराल डाऊनलोड?

इथे पहा अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक .

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना यंदा देखील कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर काही नियमांचं पालन करून परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. बोर्डच्या परीक्षेसाठी नुकतीच सीबीएसई बोर्डाकडून खास नियमावली जारी करण्यात आली आहे.