CBSE Date Sheet 2023: सोशल मीडीयामध्ये वायरल होत असलेल्या CBSE Board Exam Date Sheet खोट्या; विद्यार्थी, पालकांना परीक्षा तारखांसाठी करावी लागणार अजूनही प्रतिक्षा

बोर्डाने आत्ताच्या तारखा जाहीर केल्या नाहीत परंतु 10वी आणि 12वी या दोन्ही वर्गांसाठी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान परीक्षा होतील.

Exam | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Central Board of Secondary Education अर्थात सीबीएसई बोर्ड कडून CBSE Date Sheet 2023 कधी जारी होणार याकडे विद्यार्थी, पालकांचं लक्ष लागले आहे. त्यांच्या मनातील याच उत्सुकतेचा गैरफायदा घेत काही जण खोटे मेसेजेस वायरल करून CBSE Date Sheet 2023 बाबत संभ्रम निर्माण करत आहे. अशाच काही वायरल बातम्या पाहून बोर्डाने पुन्हा एकदा विद्यार्थी, पालकांना संयम ठेवण्याचं आवाहन केले आहे. अद्याप बोर्डाने कोणतेही वेळापत्रक जारी केलेले नाही त्यामुळे खोट्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नका असं आवाहन केले आहे.

10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी CBSE Board exam date sheet 2023 ही बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वरच जारी केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांनी cbse.gov.in यावर दिलेल्या अपडेट्सवरच लक्ष द्यावं. अन्य कोणत्याही अनधिकृत सूत्रांच्या आधारे जारी केलेले वेळापत्रक शेअर करू नये अथवा त्यावर विश्वास देखील ठेवू नये. नक्की वाचा: CBSE 10th,12th Exam 2023 Date Sheets: सोशल मीडीयात सीबीएसई परीक्षांच्या तारखांचे Viral WhatsApp Messages खोटे; बोर्डाने दिली माहिती .

सीबीएसईने प्रॅक्टिकल परीक्षेचे वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे आणि विषयनिहाय थिअरी एक्झाम अर्थात लेखी परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. सीबीएसईच्या अधिकृत सूचनेनुसार, प्रॅक्टिकल परीक्षा 1 जानेवारीपासून सुरू होतील. तोपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सूचना बोर्डाने शाळांना दिल्या आहेत. मात्र, प्रॅक्टिकल परीक्षांचे कोणतेही वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.

1 जानेवारीपासून प्रॅक्टिकल परीक्षा सुरू होणार असून तोपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षा बोर्डाने नियुक्त केलेल्या बाह्य परीक्षकांद्वारेच घेतल्या जातील, तर 10वीच्या प्रॅक्टिकल परीक्षा अंतर्गत परीक्षकांद्वारे घेतल्या जातील, असे CBSE अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

CBSE 15 फेब्रुवारी 2023 पासून बोर्ड परीक्षा 2023 सुरू करणार आहे. बोर्डाने आत्ताच्या तारखा जाहीर केल्या नाहीत परंतु 10वी आणि 12वी या दोन्ही वर्गांसाठी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान परीक्षा होतील.