CBSE Class 12 Result Update: सीबीएसई बोर्डाने सुप्रिम कोर्टात सादर केला यंदाचा 12वी निकालाचा Assessment Criteria; 31 जुलै पर्यंत निकालाची शक्यता
त्यामध्ये 12 वी प्री बोर्ड एक्झामचे अंतर्गत मुल्यमापन 40% , 10 वीचा परफॉर्मन्स 30%, 11वीचा परफॉर्मन्स 30% असे होईल.
सीबीएसई बोर्डाने (CBSE Board) यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. अंतर्गत मुल्यमापन पद्धतीच्या आधारे यावर्षी सीबीएससी बोर्ड निकाल जाहीर करेल असे सांगण्यात आले होते. विद्यार्थ्यांनाही यंदाच्या 12 वीच्या निकालाच्या नव्या फॉर्म्युलाची उत्सुकता होती. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयामध्ये (SC) सीबीएससी बोर्डाने त्यांच्या निकालाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. Maharashtra HSC Exam 2021: 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनासंदर्भात वर्षा गायकवाड यांची महत्त्वपूर्ण माहिती.
नव्या फॉर्म्युला नुसार, यंदा सीबीएसईचा 12वीचा निकाल 40:30:30 या फॉर्म्युलावर आहे. त्यामध्ये 12 वी प्री बोर्ड एक्झामचे अंतर्गत मुल्यमापन 40% , 10 वीचा परफॉर्मन्स 30%, 11वीचा परफॉर्मन्स 30% असे होईल. 10वी, 11वी चे गुण पाहताना ते 5 पैकी 3 सर्वोत्तम गुणांच्या विषयांचे ग्राह्य धरले जाणार आहेत. दरम्यान अॅटर्नी जनरल वेणूगोपाल यांनी कोर्टात माहिती देताना जे विद्यार्थी या फॉर्म्युला नुसार मिळालेल्या मार्क्स ने खुष नसतील त्यांना श्रेणी सुधारण्यासाठी कोविड स्थिती सुधारल्यानंतर होणारी परीक्षा देता येईल.
दरम्यान अद्याप सीबीएससी बोर्डाने 12वी निकालाची तारीख जाहीर केलेली नाही पण वेणूगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आता हा 12वीचा 31 जुलै पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.